IPL 2022 : मुंबईच्या पलटणमध्ये या स्टार बॉलरची एन्ट्री

आयपीएलचा 15 वा मोसम (IPL 2022) मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) आतापर्यंत फार वाईट राहिला आहे. 

Updated: Apr 29, 2022, 06:37 PM IST
IPL 2022 : मुंबईच्या पलटणमध्ये या स्टार बॉलरची एन्ट्री title=

मुंबई : आयपीएलचा 15 वा मोसम (IPL 2022) मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) आतापर्यंत फार वाईट राहिला आहे. मुंबईला सलग 8 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. सलग 8 पराभवामुळे मुंबईचं या मोसमातील आव्हान संपुष्टात आलं आहे. त्यामुळे मुंबईच्या गोटात निराशेचं वातावरण आहे. अशातच मुंबई इंडियन्समध्ये एका वेगवान गोलंदाजाची अचानक एंट्री झाली आहे. (ipl 2022 mi dhawal kulkarni join mumbai indians squad)

मुंबई इंडियन्सने आपल्या संघात अनुभवी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीचा समावेश केला आहे. धवलने जर सराव सत्रात चांगली कामगिरी केली तर, त्याला आयपीएलच्या 15 व्या मोसमातील मुंबईच्या उर्वरित सामन्यांसाठी संधी मिळू शकते.
 
सूत्रांच्या माहितीनुसार, धवल मुंबईच्या बायो-बबलसोबत जोडला गेला आहे. धवल लवकरच सरावाला सुरुवात करणार आहे. धवल मुंबईसोबत जोडल्या जाण्याआधी कॉमेंट्री करत होता. 

धवल मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला होता. धवल मुळचा मुंबईकर आहे. त्याला वानखेडे, बेब्रॉन आणि डीवाय पाटील स्टेडियमबाबत खडानखडा माहिती आहे. त्यामुळे जर धवल मुंबईसह जोडला गेला, तर निश्चितच मुंबईला त्याच्या अनुभवाचा फायदा होईल.

धवल याआधीही 2011 मध्ये मुंबईकडून खेळला आहे. धवलने आयपीएलमधील 92 सामन्यात 86 विकेट्स घेतल्या होत्या. तेव्हा मुंबईने धवलला 75 लाख रुपयात खरेदी केलं होतं.  

तसेच धवलने 12 एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. धवलने या 12 मॅचमध्ये 19 तर 2 टी 20 सामन्यात 3 विकेट्स घेतल्या आहेत.