जयसूर्यानं बायकोबरोबरचा सेक्स व्हिडिओ लिक केला?

श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्यावर बायकोबरोबरचा सेक्स व्हिडिओ लिक केल्याचा गंभीर आरोप होत आहे.

Updated: May 30, 2017, 07:21 PM IST
जयसूर्यानं बायकोबरोबरचा सेक्स व्हिडिओ लिक केला? title=

मुंबई : श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्यावर बायकोबरोबरचा सेक्स व्हिडिओ लिक केल्याचा गंभीर आरोप होत आहे. बायकोचा बदला घेण्यासाठी जयसूर्यानं हे गलिच्छ पाऊल उचलल्याचंही बोललं जात आहे. या सगळ्याप्रकरणाचा श्रीलंकेची नॅशनल सायबर सिक्युरिटी टीम चौकशी करत आहे.

एअर हॉस्टेस आणि श्रीलंकेतील प्रसिद्ध अभिनेत्री मलीका सिरिसेनानं नोव्हेंबर २०१२मध्ये सनथ जयसूर्याबरोबर लग्न केलं. यानंतर काही दिवसांनी मलीकानं जयसूर्याला सोडून एका व्यावसायीकाबरोबर लग्न केलं. जयसूर्यानंच हा व्हिडिओ लिक केल्याचा आरोप मलीकानं केला आहे. या सगळ्या आरोपांबाबत सनथ जयसूर्यानं अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

आत्तापर्यंत जयसूर्यानं तीन लग्न केली होती. जयसूर्याचं पहिलं लग्न १९९८मध्ये एअर श्रीलंकेच्या सुमुदु करुणानायक बरोबर झालं होतं. पण एका वर्षामध्येच या दोघांचं लग्न मोडलं. यानंतर जयसूर्यानं दुसरं लग्न एअर हॉस्टेस संद्रा डिसिल्वाबरोबर केलं. संद्रा आणि सनथला तीन मुलंही आहेत. त्यानंतर २०१२मध्ये सनथला मलीका भेटली आणि मग त्यानं दुसऱ्या बायकोला घटस्फोट दिला. 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x