मुंबई : आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत अनिल कुंबळेच भारतीय क्रिकेट संघाचा कोच असेल, अशी माहिती सुप्रीम कोर्टानं नियुक्त केलेले बीसीलीआयचे सीओए विनोद राय यांनी सांगतिलं आहे. पण अनिल कुंबळेनं ही जबाबदारी स्वीकारली तरच तो वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा कोच राहिल, असंही राय म्हणालेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारत ५ वनडे आणि १ टी-20 खेळण्यासाठी वेस्ट इंडिजमध्ये जाणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कोच म्हणून अनिल कुंबळेचा करार संपणार होता. त्यामुळे बीसीसीआयनं नवा कोच होण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांना अर्ज पाठवायला सांगितले होते.
या इच्छुकांचे सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांची समिती मुलाखती घेणार होती. अनिल कुंबळेच्या कार्यपद्धतीवर काही भारतीय खेळाडू नाराज असल्याचंही बोललं जात होतं. त्यामुळे आता वेस्ट इंडिज दौऱ्यानंतरच भारतीय क्रिकेट टीमच्या पूर्ण वेळ कोचची नियुक्ती होईल.