वाण नाही पण गुण लागला! सॉक्स सुकवण्यासाठी किवीच्या क्रिकेटरचा अजब जुगाड, पाहा फोटो

शनिवारी काइल जेमिसन टेन्शनमध्ये असल्याचं दिसून आलं.

Updated: Dec 4, 2021, 07:20 PM IST
वाण नाही पण गुण लागला! सॉक्स सुकवण्यासाठी किवीच्या क्रिकेटरचा अजब जुगाड, पाहा फोटो

मुंबई: भारतात जुगाडू लोकांची काही कमी नाही असं म्हटलं जातं. अगदी सर्वसामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटी आणि स्टार्सपर्यंत सर्वजण काहीना काही छोटे मोठे जुगाड करत असतात. आता असाच एक जुगाड चक्क न्यूझीलंडचा क्रिकेटर करताना दिसला आहे. हा जुगाड करण्याची वेळ किवीच्या खेळाडूवर का आली असावी असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. 

भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्या दरम्यान किवी क्रिकेटरचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. या फोटोमध्ये किवी क्रिकेटरने एक जुगाड केल्याचं दिसत आहे. 

शनिवारी काइल जेमिसन टेन्शनमध्ये असल्याचं दिसून आलं. या टेन्शनचं कारण सामना नाही तर ओले सॉक्स होते. सामन्यासाठी मैदानात उतरण्याआधी जेमीसनला सॉक्स वाळवायचे होते. त्याचे सॉक्स ओले असल्याने त्याला ते लवकर सुकवायचे होते. 

जेमिसनने वानखेडे स्टेडियमच्या बाल्कनीतील पंख्यावर हे सॉक्स लावले आणि ते लवकर सुकण्याची वाट पाहू लागला. त्याचा हा जुगाड सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला आहे.