महिला वर्ल्डकप फायनल: इंग्लंडचा टॉस जिंकत प्रथम बॅटिंगचा निर्णय

आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात महिला वर्ल्डकपचा महामुकाबला रंगणार आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Updated: Jul 23, 2017, 03:41 PM IST
महिला वर्ल्डकप फायनल: इंग्लंडचा टॉस जिंकत प्रथम बॅटिंगचा निर्णय title=

लॉर्डस : आज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात महिला वर्ल्डकपचा महामुकाबला रंगणार आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय टीमनं महिला वर्ल्ड कपची सुरुवात यजमान इंग्लंडला पराभूत करून केली होती. आणि आता फायनलमध्येही भारतीय टीमला इंग्लिश टीमचं आव्हान मोडित काढायचं आहे.

आकडे इंग्लंडच्या टीमच्या बाजूनं आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर भारतीय टीमचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे यजमान इंग्लंड भारतीय टीमला कमी लेखण्याची चूक करणार नाही. लोकल फेव्हरिट इंग्लडला पराभवाचा धक्का देत भारतीय टीमनं आपल्या वर्ल्ड कप अभियानाची सुरुवात धडाक्यात केली होती. आता या टुर्नामेंटमधील अखेरची म्हणजेच फायनल मॅच भारतीय टीम इंग्लिश टीमशीच खेळणार आहे. 

सहावेळची वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला पराभवाची धुळ चारल्यानंतर आता वुमेन इन ब्लू आणखी एक विजय मिळवत वर्ल्ड कप उंचावण्यास सज्ज आहे.