India vs Australia 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (IND vs AUS) तब्बल दोन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) आमने सामने आले आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना आजपासून नागपुरमध्ये (Nagpur) खेळवला जाणार आहे. या कसोटी मालिकेत दोन्ही टीमची केवळ प्रतिष्ठा आणि इतिहासच नाही तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलची (World Test Championship) तिकिटेही पणाला लागली आहेत. शिवाय कर्णधार म्हणून रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि पॅट कमिन्स (Pat Cummins) पहिल्यांदाच आमने-सामने येणार आहेत. हा सामना सुरू झाला असून नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
अशी आहे प्लेइंग-11
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, मॅट रेनशॉ, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (क), नॅथन लियॉन, टॉड मर्फी, स्कॉट बोलँड.
9 Feb 2023, 14:50 वाजता
पहिल्या डावात भारताच्या फिरकीत ऑस्ट्रेलियाचा संघ अडकल्याचं पहायला मिळालं. रविंद्र जडेजा आणि आर आश्विनच्या फिरकीसमोर कांगारू ऑलआऊट झाल्याचं पहायला मिळालंय.
9 Feb 2023, 14:41 वाजता
India vs Australia, 1st Test : आश्विन जडेजाची घातक गोलंदाजी, ऑस्ट्रेलियाचा डाव कोलमडला!
AUS 176/9 (62.3)
9 Feb 2023, 13:42 वाजता
India vs Australia, 1st Test: पहिल्या दिवशी भारताचं जोरदार मुसंडी...भारतासमोर ऑस्ट्रेलियन फलंदाजांचं सरेंडर
Peter Handscomb आणि Alex Carey मैदानावर
AUS 162/5 (53)
9 Feb 2023, 12:47 वाजता
IND vs AUS Live Score Updates: रविंद्र जडेजाने लंंचनंतर लगेचच मार्नसला 49 धावांवर बाद केले. त्याचे अर्धशतक अवघ्या 1 धावेने हुकले
9 Feb 2023, 11:51 वाजता
IND vs AUS Live Score Updates: ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्या दोन विकेट गमावून 75 धावा केल्या आहेत. स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन ही जोडी क्रीजवर
9 Feb 2023, 10:45 वाजता
IND vs AUS Live Score Updates: ऑस्ट्रेलियाचे 15 षटकांत 2 गडी गमावून 36 धावा केल्या. स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लॅबुशेन क्रीजवर आहेत.
9 Feb 2023, 10:20 वाजता
IND vs AUS Live Score Updates: 2 धावांच्या स्कोअरवर कांगारू संघाला पहिला धक्का, उस्मान ख्वाजा तीन चेंडूत एक धाव काढून बाद
9 Feb 2023, 10:19 वाजता
IND vs AUS Live Score Updates: ऑस्ट्रेलियाची फलंदाजी तर भारताकडून गोलंदाजीची सुरुवात करण्यासाठी अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आला आहे.