RCB vs LSG highlights : लखनऊच्या गोलंदाजांनी केले आरसीबीचे हाल बेहाल, दिली 28 धावांनी मात

RCB vs LSG Live score IPL 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनऊ सुपर जाएन्ट्स यांच्यात आयपीएलचा 15 वा सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 

RCB vs LSG highlights : लखनऊच्या गोलंदाजांनी केले आरसीबीचे हाल बेहाल, दिली 28 धावांनी मात

Royal Challengers Bengaluru vs Lucknow Super Giants Live score : बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर विराट कोहलीची आरसीबी आणि केएल राहुलची लखनऊ टीम आमने सामने येणार आहे. आयसीबीला मागील 3 सामन्यात फक्त 1 विजय मिळवता आलाय, तर लखनऊला 2 सामन्यात 1 पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे आता आजची लढत दोन्ही संघांसाठी महत्त्वाची असणार आहे.

2 Apr 2024, 23:10 वाजता

लखनऊच्या गोलंदाजांनी आरसीबीच्या फलंदाजाच्या दांड्या गूल करत 28 धावांनी आरसीबीला पराभूत केलं आहे. मयंक यादवच्या भेदक गोलंदाजीसमोर बंगळूरूचे सारे फलंदाच फेल झाले

2 Apr 2024, 23:00 वाजता

18 व्या ओव्हरमध्ये महिपाल लोमरोरच्या विकेट आरसीबीच्या जिंकायच्या आशापण संपल्या आहेत. 

2 Apr 2024, 22:55 वाजता

मॅचच्या 17 व्या ओव्हरमध्ये नवीन उल हकने आरसीबीच्या दिनेश कार्तिकला तंबूत परत पाठवलं आहे. तरी आरसीबी फॅन्सच्या आशा महिपाल लोमरोरवर टिकून आहेत.

2 Apr 2024, 22:40 वाजता

15 ओव्हरच्या समाप्तीनंतर आरसीबी 104-6 या स्थितीत आहे. कार्तिक आणि लोमरोर हे दोघं सध्या आरसीबीकडून फलंदाजीचे नेतृत्व करत आहेत

2 Apr 2024, 22:37 वाजता

मयंक यादवन परत एकदा विकेट घेत आरसीबीच्या जिंकण्याच्या आशांना धारशाही केलं आहे. रजत पाटीदारला मयंकने 29 धावांवर तंबूत पाठवले आहे.

2 Apr 2024, 22:27 वाजता

13 व्या ओव्हरीत मार्कस स्टॉयनिसने अनुज रावतला 11 धावांवर बाद करत, लखनऊला मजबूत स्थितीत नेवून ठेवलं आहे.

2 Apr 2024, 22:08 वाजता

10 व्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आरसीबी 63-4 अशा स्थितीत आहे. मैदानावर पाटीदार आणि रावत खेळत असून त्यांच्यावर आता बंगळूरूच्या फलंदाजीची जबाबदारी आहे. 

2 Apr 2024, 22:00 वाजता

8 व्या ओव्हरमध्ये लखनऊच्या गोलंदाज मयंक यादवने बंगळूरूचा धाकड ऑलराऊंडर कॅमेरन ग्रीन याला क्लिन बोल्ड केलं आहे. या विकेटमूळे आरसीबीची थोडी वाईट स्थिती झाली आहे.

2 Apr 2024, 21:47 वाजता

6 व्या ओव्हरमध्ये आरसीबीला दोन मोठे धक्के बसले आहेत. फाफ डू प्लेसी आणि ग्लेन मॅक्सवेल हे दोघं महत्वाचे फलंदाज मयंक यादवच्या एकाच ओव्हरमध्ये परतले आहेत. 6 व्या ओव्हरनंतर बंगळूरूचा स्कोर 48-3 असा आहे.

2 Apr 2024, 21:43 वाजता

5 व्या ओव्हरमध्ये लखनऊचा फिरकी गोलंदाज सिद्धार्थ याला आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहली याची विकेट मिळाली आहे. कोहली हा 22 धावा बनवून तंबूत परतला