मुंबई : आयपीएल सुरु होण्यापूर्वीच लखनऊ सुपर जायंट्स टीमला मोठा धक्का बसला होता. दुखापतीमुळे गोलंदाज मार्क वूड आयपीएलमधून बाहेर पडला. यानंतर वूडची रिल्पसमेंट लखनऊ टीम मॅनेजमेंट शोधत होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळालं असून वूडचा रिल्पेसमेंट प्लेअर मिळाला आहे. मार्क वूड ऐवजी एंड्र्यू टायचा टीममध्ये समावेश करण्यात येणार आहे.
आयपीलमधून नाव मागे घेणारा वूड तिसरा खेळाडू होता. यापूर्वी जेसन रॉय आणि एलेक्स हेल्स या दोन खेळाडूंनी आयपीएल सुरु होण्यापूर्वी लीगमधून माघार घेतली होती.
लखनऊ सुपर जायंट्सने मार्क वूडच्या जागी ऑस्ट्रेलियाचा टी-20 गोलंदाज एंड्र्यू टायला आपल्या ताफ्यात सामील करून घेतलं आहे. टाय फेब्रुवारीमध्ये झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला होता. एंड्र्यू टायसाठी लखनऊ सुपर जायंट्स ही आयपीएलमधील चौथी टीम असणार आहे. यापुर्वी तो गुजरात लायन्स, किंग्ज इलेव्हेन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स या टीम्समध्ये सहभागी होता.
वेगवान गोलंदाज एंड्र्यू टाय स्लो बॉलद्वारे विकेट घेण्यासाठी ओळखला जातो. तर टी-20 क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी चांगली आहे. एंड्र्यू टायने किंग्ज इलेव्हेन पंजाबकडून खेळताना पर्पल कॅपंही पटकावली होती. शिवाय टायच्या नावे एक हॅट्रिकंही आहे. त्याने आतापर्यंत एकूण 27 सामने खेळले असून त्याच्या नावे 40 विकेट्सची नोंद आहे.