पार्टनर की दुश्मन! आपल्याच टीममधील खेळाडूला केलं रनआऊट? पाहा काय घडलं

आपल्याच पार्टनरच्या नजरेत एका क्षणात व्हिलन बनला खेळाडू, पाहा मॅचदरम्यान नेमकं काय घडलं

Updated: May 11, 2022, 04:31 PM IST
पार्टनर की दुश्मन! आपल्याच टीममधील खेळाडूला केलं रनआऊट? पाहा काय घडलं title=

मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मंगळवारी लखनऊचा गुजरातने 62 धावांनी पराभव केला. गुजरात टीम यासोबत पॉईंट टेबलमध्ये पोहोचली आहे. या सामन्यात गुजरातने पहिल्यांना फलंदाजी केली. लखनऊसमोर त्यांनी विजयासाठी 145 धावांचं लक्ष्य ठेवलं. मात्र लखनऊ लक्ष्याचा पाठलाग करताना 82 धावांवर गारद झाला.

या सामन्यात लखनऊच्या फलंदाजांनी गुजरातसमोर गुडघे टेकले. या सामन्यात लखनऊकडून खेळताना दीपक हुड्डा आणि मार्कस फलंदाजी करत होते. तेव्हा मार्कस आपल्या टीमसाठी मोठा व्हिलन बनला. 

मार्कसमुळे दीपक हुड्डा रनआऊट झाला. लखनऊच्या 12 व्या ओव्हरमध्ये राशिद खान बॉलिंग करत होता. त्यावेळी राशिदच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये लखनऊकडून दीपक हुड्डा खेळत होता.

बॉलवर दोन धावा काढण्याचा प्रयत्न होता. दुसरी धाव काढताना दीपक हुड्डा घसरला. त्याचवेळी मार्कस दुसरी धाव काढण्यासाठी पुढे आला. दीपक हुड्डा घसरल्यामुळे दुसरी धाव काढू शकला नाही आणि तो रनआऊट झाला. 

दीपक हुड्डाने 27 धावा काढल्या आणि बाद झाला. मार्कस चांगली कामगिरी करू न शकल्याने त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x