मुंबई : भारताच्या महिला क्रिकेट टीमची कॅप्टन मिताली राजवर पुन्हा एकदा ट्विटरवर लक्ष करण्यात आलं आहे. मितालीनं तिच्या मैत्रिणींसोबतचा एक फोटो शेअर केला होता. मितालीनं या फोटोमध्ये घातलेल्या ड्रेसवरून तिला ट्रोल करण्यात आलं होतं.
हा फोटो डिलीट कर, लोकं तुला आदर्श मानतात, असे सल्ले मितालीला या फोटोवर दिले. तर तुझ्याबद्दल आदर होता तो आता संपला असल्याचं एकानं म्हणलं आहे. मिताली तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, असा रिप्लायही एकानं या ट्विटवर दिला आहे.
#tb #PostShootSelfie #funtimes #girlstakeover pic.twitter.com/p5LSXLYwmA
— Mithali Raj (@M_Raj03) September 6, 2017
याआधीही मितालीला ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका फोटोवरून ट्रोल करण्यात आलं होतं. मिथाली राजने सहकारी खेळाडू वेदा कृष्णमूर्ती, ममता माबेन आणि नूशीन अल खादीरसोबतचा ट्विटरवर एक फोटो शेअर केला. या फोटोत मितालीच्या काखेत घाम आल्याचे दिसत होतं. यावर एका ट्विटर यूजरने आक्षेपार्ह कमेंट केली. यावर मिथाली राजने तितक्याच सडेतोड शब्दात त्याला उत्तर दिलं होतं.
‘मी आज जिथे आहे त्याचं कारण मी मैदानात घाम गाळते. यात लाजिरवाणं वाटण्याचं कोणतही कारण मला दिसत नाही. आणि मी एका क्रिकेट अकॅडमीच्या उद्घाटन सोहळ्यात एका मैदानात आहे’असं मिताली म्हणाली होती. आता या ट्विटरवर मिताली काय उत्तर देणार हे पाहावं लागेल.
What a momentous day today was, standing with these special women!!@MabenMaben @AlNooshin @vedakmurthy08 pic.twitter.com/EsNwRN2G7N
— Mithali Raj (@M_Raj03) August 20, 2017
I m where I m because I sweated it out on d field! I see no reason 2 b ashamed f it, when I'm on d ground inaugerating a cricket academy. https://t.co/lC5BOMf7o2
— Mithali Raj (@M_Raj03) August 20, 2017