close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मोहम्मद अजहरुद्दीनचा हैदराबाद क्रिकेट संघाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज

भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन त्याच्या नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे.

Updated: Sep 20, 2019, 11:47 AM IST
मोहम्मद अजहरुद्दीनचा हैदराबाद क्रिकेट संघाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज

हैदराबाद : भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन त्याच्या नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. हैदराबाद क्रिकेट संघाच्या अध्यक्षपदासाठी अजहरुद्दीनने अर्ज केला आहे. अजहरुद्दीनने यासाठीची सगळी कागदपत्र निवडणूक आयुक्त व्हीएस संपत यांना दिली आहेत. २७ सप्टेंबरला हैदराबाद क्रिकेट संघाची निवडणूक होणार आहे.

अजहरुद्दीन हा त्याचं स्थानिक क्रिकेट हैदराबादमधूनच खेळला. २०१७ साली अजहरुद्दीनचा अर्ज नाकारण्यात आला होता. पण २ वर्षात पुन्हा एकदा त्याने अध्यक्षपदासाठी अर्ज केला आहे.

५६ वर्षांच्या अजहरुद्दीनने भारतासाठी ९९ टेस्ट आणि ३३४ वनडे मॅच खेळल्या. यामध्ये त्याने ६.२१५ रन आणि ९,३७८ रन केले. ९०च्या दशकात अजहरने भारताचं ४७ टेस्ट आणि १७४ वनडेमध्ये नेतृत्व केलं होतं.

मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे बीसीसीआयने अजहरुद्दीनवर कायमची बंदी घातली. पण २०१२ साली आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयाने ही बंदी बेकायदेशीर ठरवली. २००९ साली अजहरुद्दीन मोरादाबाद मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर खासदार झाला होता.