Viral Video : T20 विश्वचषक सामन्यानंतर पाकिस्तानी Mr. Bean झिम्बाब्वेच्या प्रेमात, जाणून घ्या प्रकरण

Pak vs Zim T20 :  T20 वर्ल्ड कपमधील पाकिस्तान - झिम्बाब्वे मॅचनंतर  6 वर्षे जुना वाद पुन्हा उफाळून आला आहे. 

Updated: Oct 30, 2022, 09:19 AM IST

Mr_Bean_Controversy_Video

Mr. Bean Controversy T20 WC 2022 : ऑस्ट्रेलियामध्ये T20 World Cup 2022 चे सामने रंगत आहेत. भारत आज दक्षिण आफ्रिकेसोबत (South Africa) दोन हात करणार आहे. तिकडे पाकिस्तानचा (Pakistan) T20 World Cup 2022 मधील प्रवास खडतर झाला आहे. भारताकडून पराभव झाल्यानंतर झिम्बाब्वेने (Zimbabwe) देखील 1 रन्सने पाकचा पराभव केला. त्यानंतर T20 World Cup 2022 मध्ये पाकिस्तानच्या खेळीबद्दल सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या आहेत. अशातच  पाकिस्तान झिम्बाब्वे मॅचनंतर Mr. Bean यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Video viral on social media) सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 

'आय लव यू झिम्बाब्वे'

या व्हिडीओनंतर पाकिस्तान आणि झिम्बाब्वे क्रिकेट चाहत्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. या व्हिडीओमध्ये Mr. Bean यांनी 'आय लव यू झिम्बाब्वे' म्हटल्यानंतर सोशल मीडियावर एकच धुमाकूळ माजला आहे. (Mr Bean Controversy T20 WC 2022  Viral Video Trending on Twitter nmp)

कहाणीमध्ये ट्वीस्ट 

या व्हिडीओमधील Mr. Bean हा एक पाकिस्तानी कॉमेडियन आहे. जो हूबेहूब मिस्टर बीनसारखा दिसतो. आसिफ मोहम्मद (Asif Mohammad) असं या कॉमेडियनचं नाव असून 2016 मध्ये एका कार्यक्रमासाठी त्याने झिम्बाब्वेचा दौरा केला होता. या पाकिस्तानी कॉमेडियनने झिम्बाब्वेची तारीफ केल्यानंतर एकच वाद निर्माण झाला आहे. 

काय आहे पाक मिस्टर बीन वाद? (What is Pak Mr. Bean Controversy?)

T20 वर्ल्ड कपमधील पाकिस्तान - झिम्बाब्वे मॅचनंतर  6 वर्षे जुना वाद पुन्हा उफाळून आला आहे. झिम्बाब्वेने 6 वर्षांनंतर बदला पूर्ण केला. सामन्यापूर्वी दोन्ही संघांचे खेळाडू सराव करत असताना फेक मिस्टर बीनचा वाद सोशल मीडियावर चर्चेत होता. हा तोच वाद आहे ज्यावर झिम्बाब्वेच्या राष्ट्राध्यक्षांनीही टीका केली आणि त्यानंतर पाकिस्तानचे वझीर-ए-आझम शाहबाज शरीफ भडकले. मोहम्मद आसिफला मिस्टर बीन दाखवून पाकिस्तानने ज्या प्रकारे झिम्बाब्वेचा विश्वासघात केला, त्यामुळे चाहते चांगलेच संतापले होते. सोशल मीडियावरील जुन्या व्हिडिओंच्या मालिकेत असिफला हरारेमध्ये पोलिसांची सुरक्षा कशी मिळाली हे पाहिले जाऊ शकते. लोकांनी असिफसोबत फोटोही काढले आणि त्याला खरा मिस्टर बीन मानून खूप आदर दिला.

मिस्टर बीन लोकप्रिय

झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यापूर्वी पाकिस्तानी मिस्टर बीन लोकप्रिय झाले होते. खरं तर, Ngugi Chasura नावाच्या एका झिम्बाब्वेच्या व्यक्तीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या एका पोस्टवर कमेंट करताना म्हटलं होतं की, 'झिम्बाब्वेचे लोक म्हणून आम्ही तुम्हाला माफ करणार नाही... तुम्ही एकदा आम्हाला मिस्टर बीन रोवनऐवजी फ्रॉड पाक बीन म्हटलं होतं...पाऊस तुम्हाला वाचवो अशी प्रार्थना करा."

चासुराचा अंदाज खरा ठरला आणि पाकिस्तानला सामना गमवावा लागला. यासोबतच बनावट मिस्टर बीन ट्विटरवर ट्रेंड (Trending on Twitter) करू लागला. झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष इमर्सन डंबुडझो म्नांगाग्वा यांनीही ट्विट केले, 'झिम्बाब्वेसाठी हा काय विजय आहे! शेवरॉनचं अभिनंदन. पुढच्या वेळी खरे मिस्टर बीन पाठवा...#PakvsZim'