MS Dhoni : इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला कॅप्टन कूल, व्हिडीओ होतोय व्हायरल

MS Dhoni riding electric cycle : भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये धोनी हा भारतीय कंपनीने बनवलेल्या इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसत आहे. 

Updated: Mar 30, 2024, 05:22 PM IST
MS Dhoni : इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला कॅप्टन कूल, व्हिडीओ होतोय व्हायरल title=

MS Dhoni Viral Video : महेंद्रसिंग धोनी हा कार आणि बाईकचा फार मोठा चाहता आहे, हे सत्य लोकांपासून लपलेलं नाही. धोनीच्या गॅरेजमध्ये विविध प्रकारच्या कार आणि बाईकचे कलेक्शन आहे आणि हे साऱ्या लोकांनी सोशल मीडियाद्वारे अनेक व्हिडीओमध्ये बघितलेलं आहे. अशाच एका नवीन व्हिडीओमध्ये महेंद्रसिंग धोनी हा मेड-इन-इंडिया फोल्डेबल इलेक्ट्रिक बाईक चालवताना दिसत आहे. धोनीचा हा व्हिडीओ सोशल मिडीयावर खूप व्हायरल होत आहे. त्यावर प्रेक्षकांनी भन्नाट प्रतिक्रिया देखील दिल्यात.

या व्हिडीओमध्ये कॅप्टन कूल खूप साध्या लूकमध्ये इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसतोय, इलेक्ट्रिक सायकल चालवताना धोनीच्या या व्हिडीओला एका दिवसात तब्बल 1.7 मिलियन व्यूज मिळालेले आहेत. 

पाहा Video

 

 

इलेक्ट्रिक बाईकचे वैशिष्टे

धोनीच्या या इलेक्ट्रिक गाडीच्या वैशिष्ट्यांचा विचार केला तर ही एक फोल्डेबल इलेक्ट्रिक बाईक आहे, गाडीचा कमाल वेग 25 किमी प्रति तास आहे, सामान्य पायडल सायकलप्रमाणे सूद्धा या बाईकचा वापर करता येतो, या सायकलीला पूर्णपणे इलेक्ट्रिक मोडमध्ये किंवा जास्त असिस्टंस राइड या दोन्ही पद्धतींचा वापर करून चालवता येते. यामध्ये 12.75 MAh बॅटरी पॅक असून पूर्णपणे चार्ज केल्यानंतर या इलेक्ट्रिक सायकलचा जास्तीत जास्त 60 किमी पर्यंत वापर करता येतो. या ई-बाईकमध्ये 7-स्पीड शिमॅनो गियर सिस्टम देखील आहेस, यासोबतच यात एलसीडी डिस्प्ले आणि अनेक आधुनिक दुचाकी वाहनांप्रमाणेच यूएसबी चार्जिंग पोर्टसूद्धा आहे.

धोनी एक दूचाकी चालवताना दिसणं हे काही नवीन नाही, याआधीही धोनीचे अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पण या व्हिडीओमध्ये नवीन गोष्ट म्हणजे ही ई-बाईक पर्यावरण अनुकूल आहे. या बाईकने पर्यावरणावर कोणत्याही प्रकारची हाणी पोहोचणार नाही आणि अशाप्रकारे धोनी हा आपल्या फॅन्सला पर्यावरणाबद्दल जागरूक करत पर्यावरण वाचवण्याचा मॅसेजसुद्धा या व्हिडीओच्या माध्यमातून देत आहे.