Mumbai Indians : आयपीएलपूर्वीच नीता अंबानींची मोठी खेळी; भारतीय खेळाडूची टीममध्ये केली एन्ट्री!

मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएलच्या वातावरणात रविवारी एक मोठी घोषणा केली आहे.

Updated: Feb 6, 2023, 02:55 PM IST
Mumbai Indians : आयपीएलपूर्वीच नीता अंबानींची मोठी खेळी; भारतीय खेळाडूची टीममध्ये केली एन्ट्री! title=

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) आयपीएलच्या वातावरणात रविवारी एक मोठी घोषणा केली आहे. फ्रेचायझीने त्यांच्या सपोर्ट स्टाफबाबत एक मोठी अपडेट दिली आहे. महिला प्रीमियर लीग (WPL 2023) च्या पहिल्या सिझनबाबत ही घोषणा केली असून, टीमने 3 मोठी नावं आपल्यासोबत जोडली आहेत. आगामी सिझनमध्ये ही 3 मोठी नावं मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात जोडली जाणार आहेत. 

या तीन नावांमध्ये एक नाव भारतीय दिग्गज महिला क्रिकेटरचं आहे. याशिवाय इंग्लंडची दिग्गज क्रिकेटर आणि कोचला मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सिझनसाठी हेड कोच म्हणून नियुक्त केलं आहे. 

माजी भारतीय खेळाडूची ताफ्यात एन्ट्री

मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीग (WPL 2023) च्या पहिल्या सिझनसाठी लिए शार्लेट एडवर्ड्स (Charlotte Edwards) हिला हेड कोच म्हणून नियुक्त केलं आहे. तर महिला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी झूलन गोस्वामी हिला टीमचं मेंटॉर आणि गोलंदाज कोच म्हणून नियुक्त केलं आहे. याशिवाय देविका पालिशिकर या खेळाडूला फलंदाजीच्या कोचपदाची धुरा देण्यात आली आहे.

सौरव गांगुलीची ऑफर झूलनने नाकारली 

दिग्गज महिला क्रिकेटर मिताली राज ही गौतम अदानी ग्रुपची टीम गुजरात जायंट्ससोबत मेंटॉर आणि सल्लागार म्हणून जोडली गेली आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी झूलन गोस्वामी हिला दिल्ली कॅपिट्ल्सच्या फ्रेंचायझीसोबत महिला प्रीमियर लीगमध्ये येण्याची ऑफर दिली होती. मात्र झुलनने दादाची ऑफर नाकारली आणि ती मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचायझीसोबत जोडली गेली. 

5 टीम 4669.99 कोटी रुपये

पहिल्या महिला प्रीमिअर क्रिकेट लीगमध्ये एकुण 5 संघ असतील आणि पहिल्याच हंगामात हे संघ तब्बल 4669.99 कोटी रुपयांना विकले गेलेत. यात सर्वाधिक महागडा संघ अहमदाबादचा ठरला आहे. अदानी स्पोर्ट्सलाईनने अहमदाबात संघ तब्बल 1289 कोटी रुपयांना विकत घेतलाय. याशिवाय मुंबई, बंगळुरु आणि दिल्ली संघ अनुक्रमे  912.99 कोटी, 901 कोटी आणि 810 कोटी रुपयांना विकले गेलेत. तर कॅप्री ग्लोबल होल्डिंग कंपनीने लखनऊ संघ 757 कोटी रुपयांना विकत घेतला.

मार्चमध्ये महिला प्रीमिअर लीग?

बीसीसीआयने महिला प्रीमिअर लीगच्या वेळापत्रकाची घोषणा अद्याप केलेली नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही स्पर्धा याचवर्षी 4 ते 26 मार्च दरम्यान होऊ शकते. पहिल्या हंगामात पाच संघांमध्ये एकूण 22 सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे. हे सर्व सामने मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडिअम आणि नवी मुंबईतल्या डिवाय पाटील स्टेडिअमवर खेळवले जाऊ शकतात.