India vs Zimbabwe ICC T20 World Cup 2022 : टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा (Team India) आजचा सामना हा झिम्बाब्वेविरुद्ध (Zimbabwe) होणार आहे. त्याआधीच भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. मात्र तरीही हा सामना भारतासाठी महत्तवाचा ठरणार आहे. रोहित शर्मा आणि संघ रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झिम्बाब्वे विरुद्धच्या लढतीत सुपर 12 चा शेवटचा सामना खेळणार आहे. पाकिस्तानने बांगलादेशला पाच विकेट्सने पराभूत करून अंतिम चारमध्ये भारतासोबत सामील झाला आहे. भारताने यावेळी टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यावेळी संघात मोठा बदल करण्यात आला आहे. दिनेश कार्तिकच्या जागी ऋषभ पंतला संघात संधी देण्यात आली आहे.
रोहित शर्मा स्वस्तात बाद
भारतीय संघाला चौथ्या षटकातच पहिला धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 15 धावा करून बाद झाला. मोठा शॉट खेळण्याच्या नादात रोहित शर्माने आपली विकेट गमावली. त्यानंतर विराट कोहलीने आक्रमने खेळत चौकारांचा पाऊस पाडला आहे.
विराट, केएल राहुल बाद
भारतीय संघाला 12व्या षटकात दुसरा धक्का बसला. विराट कोहली 26 धावा करून बाद झाला. शॉन विल्यम्सने त्याची विकेट घेतली. त्याने केएल राहुलसोबत 48 चेंडूत 60 धावांची भागीदारी केली. तर विराट पाठोपाठ केएल राहुलही बाद अर्धशतक करुन बाद झाला. केएल राहुलने 51 धावा केल्या. सिकंदर रझाने विकेट घेतली.
ऋषभ पंत 3 धावांवर बाद
ऋषभ पंतच्या विकेटने भारतीय संघाला चौथा धक्का बसला. ऋषभ पंतला सीन विल्यम्सने 3 धावांवर बाद केले.
दरम्यान, टी-20 विश्वचषकात 4 सामन्यांत 3 विजयांसह टीम इंडिया (Team India) सध्या 6 गुणांसह ग्रुप-2 मध्ये पहिल्या स्थानावर आहे. झिम्बाब्वेविरुद्ध भारताने विजय मिळवल्यास भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र भारताचा पराभव झाला तर अंतिम चारमध्ये पोहोचलेल्या न्यूझीलंडविरुद्ध भारताला अंतिम सामना खेळावा लागणार आहे. तर पाकिस्तानविरुद्ध इंग्लड असा सामना पाहायला मिळू शकतो.
भारत (प्लेइंग इलेव्हन) : केएल राहुल, रोहित शर्मा (क), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग
झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन) : वेस्ली मधवेरे, क्रेग एर्विन (क), रेगिस चकाब्वा (विकेटकीपर), सीन विल्यम्स, सिकंदर रझा, टोनी मुन्योंगा, रायन बुर्ले, तेंडाई चत्रा, रिचर्ड नगारवा, वेलिंग्टन मसाकादझा, ब्लेसिंग मुजरबानी