Pakistan Vs England Test Match: पाकिस्तान आणि इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात स्टार फलंदाज जो रुटनं जबरदस्त खेळी केली. जो रूटनं 69 चेंडूत 73 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार मारले. मात्र जो रुटनं लेफ्ट हँडेड फलंदाजी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. रावलपिंडीतील पाटा पिचचा जो रुटनं चांगलाच फायदा घेतला. पाकिस्तानचा फिरकीपटू जाहिद महमूदला डावखुरा खेळत सामोरा गेला. दुसऱ्या डावातील 23 व्या षटकात त्याने अशा पद्धतीने फलंदाजी केली. अर्धशतक झळकावल्यानंतर जो रूटनं लेफ्ट हँडेड बॅटिंग केली. त्याने पहिला चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षकाकडे तटावला पण रन घेण्यास अपयशी ठरला. त्यानंतर दुसरा फटका त्याच दिशेने मारला मात्र यावेळी बाद होता होता वाचला.
जो रुटनं त्यानंतर सामान्यपणे फलंदाजी करण्यास सुरुवात केली. मात्र 73 या धावसंख्येवर असताना जाहीद महमूदच्या गोलंदाजीवर इमाम उल हकनं झेल घेतला. इंग्लंडनं चौथ्या दिवशी पाकिस्तानसमोर 343 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान गाठताना पाकिस्तानचे फलंदाज झटपट बाद झाले. पाचव्या दिवशी संध्याकाळच्या चहापानापर्यंत 9 गडी बाद 268 धावा केल्या आहेत. पाकिस्तानला विजयासाठी 75 धावांची आवश्यकता आहे. मात्र 1 गडी शिल्लक असल्याने हे आव्हान गाठणं कठीण आहे.
Joe Root simply bats left handed. Remarkable pic.twitter.com/CXUr3dLCS8
— Will Macpherson (@willis_macp) December 4, 2022
जो रूटच्या फलंदाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून आपल्या प्रतिक्रिया नोंदवत आहे.