तुझ्याशिवाय आयुष्य नाही…,स्मृती मानधनाच्या वाढदिवसानिमित्त प्रियकराने शेअर केले रोमँटिक फोटो

स्टार फलंदाज स्मृती मानधना 28 वर्षांची झाली आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या प्रियकराने सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. जे सध्या तुफान व्हायरल होत आहेत. 

सोनेश्वर पाटील | Updated: Jul 19, 2024, 07:05 PM IST
तुझ्याशिवाय आयुष्य नाही…,स्मृती मानधनाच्या वाढदिवसानिमित्त प्रियकराने शेअर केले रोमँटिक फोटो title=

Smriti Mandhana 28th Birthday : स्मृती मानधना ही महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज आहे . तिने 18 जुलैला तिचा 28 वा वाढदिवस साजरा केला आहे. तिने तिचा हा खास दिवस तिच्या बॉयफ्रेंड गायक पलाश मुच्छलसोबत साजरा केला आहे. नुकतीच पलाशने आपल्या गर्लफ्रेंडसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. जी सध्या तुफान व्हायरल होत आहे. 

स्मृती मानधनाला क्रिकेटची राणी म्हटलं जाते. जगभरात तिचा मोठा चाहता वर्ग आहे. स्मृती 28 वर्षांची झाल्यानंतर चाहत्यांनी तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. 

पलाशकडून स्मृतीच्या वाढदिवशी प्रेमाचा वर्षाव

गायक आणि संगीतकार पलाश मुच्छल याने काल रात्री उशिरा त्याची गर्लफ्रेंड आणि टीम इंडियाची फलंदाज स्मृती मानधनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यामध्ये त्याने सोशल मीडियावर दोघांचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. सध्या पलाशने दिलेल्या कॅप्शनची जोरदार चर्चा रंगली आहे. 

त्याने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, माझ्या सुंदर मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस. तुझ्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही करु शकत नाही. सध्या त्याच्या रोमँटिक पोस्टवर प्रतिक्रिया येत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

स्मृती 5 वर्षांपासून करतेय डेट

स्मृती मानधना ही पलाश मुच्छलला गेली पाच वर्षांपासून डेट करत आहे. नुकतीच त्यांनी त्यांच्या नात्याची पाच वर्षे साजरी केली आहेत. दोघांनी केक देखील सोबत कापला आहे. सध्या त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पलाशने स्मृतीच्या वाढदिवसानिमित्त दोघांचे फोटो देखील शेअर केले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव देखील करताना दिसत आहेत. 

स्मृती मानधनाची आतापर्यंतची कारकीर्द 

स्मृती मानधनाने भारतीय महिला संघासाठी 7 कसोटी सामने खेळले आहेत.  या सामन्यांमध्ये  तिने 629 धावा केल्या आहेत. ज्यात 2 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेट सामन्यात तिने 85 सामने खेळताना 3585 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये 7 शतके आणि 27 अर्धशतकांचा समावेश आहे. तिने 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3320 धावा केल्या आहेत.