मुंबई : आयपीएलमधील 52 वा सामना पंजाब विरुद्ध राजस्थान होणार आहे. प्लेऑफपर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही टीममध्ये काँटे की टक्कर आज पाहायला मिळणार आहे. पंजाब टीमसाठी हा विजय महत्त्वाचा असणार आहे. तर दुसरीकडे राजस्थानला प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचं आहे.
राजस्थान टीम गुजरातला कडवी लढत देत असताना मध्येच लिंक तुटली आणि त्यामुळे तिसऱ्या स्थानावर आली. तर पंजाब टीम पुन्हा एकदा सावरण्याचा प्रयत्न करणार आहे. पंजाबला विजय मिळवणं जर आज शक्य झालं नाही तर प्लेऑफपर्यंतचा रस्ता कठीण आहे.
राजस्थानकडे उत्तम गोलंदाज आहेत. युजवेंद्र चहलच्या बॉलिंगसमोर भल्याभल्यांची दांडी गुल होते. तर पंजाबकडे उत्तम फलंदाजांची फळी आहे. त्यामुळे पंजाबला राजस्थानचे खेळाडू कसे रोखणार हे पाहावं लागणार आहे.
पंजाब विरुद्ध राजस्थान आतापर्यंत 23 सामने खेळले आहेत. पंजाबने 10 तर राजस्थानने 13 सामने जिंकले आहेत. पंजाबचा 223 धावांचा सर्वात हाय स्कोअर राहिला आहे. तर राजस्थानचा 226 राहिला आहे. आजच्या सामन्यात काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
पंजाब टीम संभाव्य प्लेइंग इलेव्हन : मयंक अग्रवाल (कर्णधार), शिखर धवन, जॉनी बेयरस्टो, भानुका राजपक्षे, लियाम लिविंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), ऋषि धवन, कगिसो रबाडा, राहुल चाहर, अर्शदीप सिंह, संदीप शर्मा
राजस्थान टीम संभाव्य प्लेइंग इलेव्हन : जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन (कर्णधार आणि विकेटकीपर), करुण नायर, शिमरोन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल, कुलदीप सेन