कुस्तीच्या मैदानात पॉर्नस्टार, पैलवानाने केले अश्लील वर्तन

माजी पॉर्नस्टार मिया खलीफा हे एक बहुचर्चीत नाव. गेल्या काही काळात मिया कुस्तीच्या मैदानातही हजेरी लावताना दिसत आहे. अर्थात तिच्या चाहत्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असली तरी....

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 22, 2018, 10:40 PM IST
कुस्तीच्या मैदानात पॉर्नस्टार, पैलवानाने केले अश्लील वर्तन title=

नवी दिल्ली : माजी पॉर्नस्टार मिया खलीफा हे एक बहुचर्चीत नाव. जगभरात बहुतेकांना ठाऊक. गेल्या काही काळात मिया कुस्तीच्या मैदानातही हजेरी लावताना दिसत आहे. अर्थात तिच्या चाहत्यांसाठी ही महत्त्वाची बातमी असली तरी, ती कुस्तीच्या मैदानात येताच काही वादही निर्माण झाल्याची वातावरणे आहेत. आखाड्यात असलेल्या एका पैलवानासोबत नुकताच तिचा वाद झाला.

मीडिया रिपोर्टनुसार, मिया नुकतीच कुस्तीच्या (रेसलींग) आखाड्यात उतरली. तिला पाहताच पैलवानाने (रेसलर) अश्लिल वर्तन करण्यास सुरूवात केली. त्याचे वर्तन पाहून मियाचा अंगरक्षक भलताच चिडला. त्याने थेट त्या पैलवानावर हल्ला केला आणि त्याला चोप देण्यास सुरूवात केली. पण, त्या पैलवानानेही उलट प्रतिकार करत मियाच्या अंगरक्षकावर प्रतिहल्ला चढवला.

मियासोबत असे वर्तन करणाऱ्या पैलवानाचे नाव जॉय रेयान असे असल्याचे समजते. कुस्तीच्या आखाड्यात उतरलेल्या मियाने जॉय रेयानला लांब केसांचे बाळ म्हटले आणि ती तिच्या विधानावर ठाम राहिली. त्यामुळे चिडलेल्या रेयानने अश्लिल वर्तन करण्यास सुरूवात केली. मात्र, अंगरक्षकाने केलेल्या हस्तक्षेपामुळे मियाला कोणताही धोका पोहोचू शकला नाही. पण, दरम्यान, मियाने WWEवर टीका करणे सुरूच ठेवले. या पूर्वीही मियाने WWEवर टीका केली आहे. हा खेळ माला तितका आकर्षित करणारा वाटला नाही. करण, हा खेळ नकली आहे. तिच्या या विधाननंतर जोरदार वाद निर्माण झाला होता.