जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : पी व्ही सिंधू अंतिम फेरीत

जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूने अंतिम फेरीत प्रवेश

Updated: Aug 4, 2018, 08:06 PM IST
जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : पी व्ही सिंधू अंतिम फेरीत
संग्रहित छाया - Twitter

बीजिंग : जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूने अंतिम फेरीत प्रवेश केलाय. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जपानच्या अकाने यामागुची हिचा २१-१६, २४-२२ असा पराभव केला. सामन्यातील पहिला गेम संघर्षपूर्ण झाला, पण तो सिंधूने २१-१६ अशा फरकाने जिंकला. 

सिंधूने दुसऱ्या गेममध्ये यामागुची हिने १९-१२ अशी आघाडी घेतली होती. पण त्यांनतर सिंधूने जोरदार कमबॅक करत २०-२० अशी बरोबरी साधली. त्यांनतर सामना अत्यंत रंगतदार झाला. अखेर सिंधूने २४-२२ असा गेम जिंकत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत तिचा सामना कॅरोलिना मरीन हिच्याशी होणार आहे.

चीनमध्ये सुरु असलेल्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधूने जपानच्या नोझुमी ओकुहारा हिचा २१-१७, २१-१९ असा पराभव केला होता. या विजयाबरोबरच ओकुहाराने मागील स्पर्धेत तिच्या केलेल्या पराभवाचा वचपा काढला. थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधूला पराभवाला सामोरे जावे लागले होते.