बॅडमिंटन: पी.व्ही.सिंधू विरूद्ध कॅरोलिना मरीन रंगणार सामना

आतापर्यंत या दोघींमध्ये ११ लढती झाल्या आहेत. यातील मरीन यांनी ६ सामने जिंकले आहेत. तर सिंधूनं ५ लढती जिंकल्या आहेत.

Updated: Aug 5, 2018, 12:53 PM IST
बॅडमिंटन: पी.व्ही.सिंधू विरूद्ध कॅरोलिना मरीन रंगणार सामना

नवी दिल्ली: भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पी.व्ही.सिंधू आणि स्पेनची स्टार खेळाडू कॅरोलिना मरीन यांच्यामध्ये बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप्सची अंतिम लढत रंगणार आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये या दोघी आमने-सामने आल्या होत्या. त्यावेळी कॅरोलिना मरिननं बाजी मारली होती.

दोघींमध्ये ११ वेळा लढती

आतापर्यंत या दोघींमध्ये ११ लढती झाल्या आहेत. यातील मरीन यांनी ६ सामने जिंकले आहेत. तर सिंधूनं ५ लढती जिंकल्या आहेत. यापूर्वी वर्ल्ड चमॅम्पियनशिप्सच्या उपांत्य फेरीत या दोघी आमने-सामने आल्या होत्या. त्यामध्येही मरीन जिंकली होती. तर या दोघींमध्ये अखेरची लढत मलेशियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत झाली असून सिंधूनं मरीनला पराभूत केलं आहे.

वर्ल्ड चॅम्पीयन्समध्ये सिंधूची दुसऱ्यांदा धडक

दरम्यान, सिंधूंनं सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप्सच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. गेल्या चॅम्पियनशिप्समध्ये सिंधूला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं.