FIFA Football World Cup : कतारमध्ये आयोजित केलेल्या फिफा फुटबॉल विश्वचषकाची सध्या जगभरात चर्चा आहे. आपल्या आवडत्या संघाला खेळतानाही पाहण्यासाठी जगभरातील चाहते कतारमध्ये पोहोचले आहेत. स्पर्धेच्या आयोजनावरुन सुरुवातीला कतारवर जोरदार टीका केली होती. मात्र कतारने मोठ्या थाटामाटात या वर्ल्ड कपचे (Football World Cup) आयोजन केले आहे. मात्र आता या आयोजनाची काळी बाजू समोर आली आहे. या स्पर्धेचे आयोजन करणाऱ्यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. या स्पर्धेच्या आयोजनसाठी झटणाऱ्या तब्बल 400 ते 500 कामागारांचा बळी गेल्याची कबुली कतारने दिली आहे.
वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनात गुंतलेल्या एका उच्च कतारच्या अधिकार्याने पहिल्यांदाच या स्पर्धेशी संबंधित कामगारांची मृतांबाबत माहिती दिली आहे. कतारच्या सर्वोच्च समितीचे सरचिटणीस हसन अल-थवाडी यांनी ब्रिटीश पत्रकार पियर्स मॉर्गन यांना दिलेल्या मुलाखतीत ही आकडेवारी सांगितली. याआधीही दोहाने या स्पर्धेची तयारी करणाऱ्या कामगारांच्या मानवी हक्काचे उल्लंघन होत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.
8 स्टेडियममध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन
फिफासाठी उभारल्या जाणाऱ्या 8 स्टेडियममध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन आणि वर्णभेदाच्या घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. या स्पर्धेसाठी अनेक वर्षांपासून तयारी सुरू होती. हजारो स्थलांतरित मजुरांना 200 अब्ज डॉलरपेक्षा जास्त किमतीचे स्टेडियम, मेट्रो लाईन आणि स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या नवीन पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी काम देण्यात आले होते. यामध्ये शेकडो कामगारांचा मृत्यू झालाय.
हे ही वाचा >> मजुरांवर शौचालयात अंघोळ करण्याची वेळ; फुटबॉलच्या महाकुंभात मानवी हक्कांचं उल्लंघन?
माझ्याकडे अचूक आकडे नाहीत - हसन अल-थवाडी
ब्रिटीश पत्रकार मॉर्गन यांना दिलेल्या मुलाखतीत हसन यांना विश्वचषक स्पर्धेसाठी काम केल्यामुळे स्थलांतरित कामगारांच्या मृत्यूची खरी आकडेवारी काय आहे?, असे विचारले होते. यावर उत्तर देताना 'अंदाजे आकडेवारी 400 ते 500 च्या दरम्यान आहे. माझ्याकडे अचूक आकडे नाहीत. पण या आकड्याची आधी सार्वजनिक चर्चा झाली नव्हती,' असे हसन यांनी म्हटले आहे.
World Cup boss Hassan Al-Thawadi tells Piers Morgan 400-500 migrant workers have died as a result of work done on projects connected to the tournament.
"Yes, improvements have to happen."@piersmorgan | @TalkTV | #PMUQatar pic.twitter.com/Cf9bgKCFZe
— Piers Morgan Uncensored (@PiersUncensored) November 28, 2022
कतार सरकारच्या म्हणण्यानुसार फिफाचे आयोजन सुरु झाल्यापासून 2021 मध्ये 6500 पेक्षा जास्त प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेशमधील नागरिकांचा समावेश होता. पण त्यांचा मृत्यू कसा आणि कधी झाला याची माहिती सरकारने दिलेली नाही. तर फिफा वर्ल्ड कपसाठी स्टेडियम तयार करण्यासाठी 30,000 परदेशी मजुरांना काम देण्यात आले होते. यामध्ये 500 कामगार गंभीर 37,600 जण किरकोळ जखमी झाले होते.