Rafael Nadal Announces Retirement: महान टेनिसपटू राफेल नदालने टेनिस खेळाचा निरोप घेतला आहे. मंगळवारी (20 November) त्याने कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. त्याच्या घरातील 'मलागा' येथील चाहत्यांनी खचाखच भरलेल्या स्टेडियमसमोर तो स्पेनकडून शेवटच्या वेळी खेळताना दिसला. 22 वेळा ग्रँडस्लॅम विजेता स्टार आपल्या कारकिर्दीचा शेवट विजयाने करेल, अशी आशा चाहत्यांना वाटत होती, मात्र तसे होऊ शकले नाही. डेव्हिड चषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याला नेदरलँडच्या खेळाडूकडून पराभवाचा सामना करावा लागला. स्पेनचा संघ २-१ ने पराभूत होऊन स्पर्धेतून बाहेर पडला.
डेव्हिड चषकाच्या उपांत्यपूर्व फेरीतील एकेरीच्या सामन्यात 38 वर्षीय नदालला नेदरलँडच्या बोटिक व्हॅनने सलग दोन सेटमध्ये 6-4, 6-4 ने पराभूत केले. नदालच्या निरोपाच्या भाषणादरम्यान चाहत्यांनी खचाखच भरलेले स्टेडियम राफा, राफा अशा आवाजाने दुमदुमले होते. टेनिस कोर्टवर चाहत्यांसमोर शेवटचे बोलत असताना नदालच्या डोळ्यात अश्रू तरळले. साहजिकच इतक्या वर्षांच्या टेनिस खेळानंतर अशा महान खेळाडूचा निरोप घेणे हा भावनिक क्षण होता.
हे ही वाचा: मेस्सी भारतात येऊन खेळणार, चाहत्यांना याची देही याची डोळा बघता येणार सामना
नदालने यापूर्वीच निवृत्ती जाहीर केली होती. डेव्हिस चषक ही आपली शेवटची स्पर्धा असेल, असे तो म्हणाला होता. शेवटचा सामना खेळल्यानंतर नदाल म्हणाला, "पुरस्कार, नंबर्स, आहेत आणि लोकांना ते माहित आहेत. मला ज्या गोष्टीला जास्त लक्षत ठेव्याचे आहे ते म्हणजे मी मॅलोर्काच्या एका छोट्या गावातला एक छान माणूस आहे." असे सांगताच स्टेडियम टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजले.
हे ही वाचा: हार्दिक पांड्याने केला करिष्मा, ICC क्रमवारीत प्रथम क्रमांक मिळवत घडवला इतिहास
There are no words to thank you enough for what you’ve done to the sport.
Gracias, Rafa @RafaelNadal | #RafaSiempre
— ATP Tour (@atptour) November 19, 2024
पराभवानंतर नदाल म्हणाला की, "हा माझा शेवटचा सामना होता. मी डेव्हिस कपमधील माझा पहिला सामना गमावला आणि मी माझा शेवटचा सामनाही गमावला. यासाठी आम्ही वर्तुळाला बंद करूयात." अलीकडच्या काळात नदालच्या कारकिर्दीवर दुखापतींचा अधिक परिणाम झाला आहे. नदाल म्हणाला, "अनेक लोक मेहनत करतात. बरेच लोक दररोज त्यांचे सर्वोत्तम प्रयत्न करतात. मी खूप भाग्यवान आहे. मला फक्त एक चांगली व्यक्ती आणि एक लहान मूल म्हणून स्मरणात राहायचे आहे ज्याने त्याच्या स्वप्नांचा पाठलाग केला. मी कधीही स्वप्न पाहिले त्यापेक्षा जास्त साध्य केले."
Rafa Nadal during his retirement speech:
“The titles, numbers, they’re there. People probably know that. The way I’d like to be remembered more is like a good person from a small village in Mallorca.”
— The Tennis Letter (@TheTennisLetter) November 19, 2024
राफेल नदालने 14 फ्रेंच ओपन विजेतेपदांसह विक्रमी 22 ग्रँड स्लॅम पुरुष एकेरीची विजेतेपदे जिंकली. कोणत्याही खेळाडूने कोणत्याही ग्रँडस्लॅम स्पर्धेत जिंकलेल्या विजेतेपदांपेक्षा हे अधिक आहे. त्याच्या नावावर चार यूएस ओपन आणि दोन ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपदांचाही समावेश आहे.