close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

फुटबॉल खेळाडू रोनाल्डो 2 वर्ष तुरुंगात जाणार

रोनाल्डो तुरुंगात जायला तयार...

Updated: Jun 15, 2018, 09:14 PM IST
फुटबॉल खेळाडू रोनाल्डो 2 वर्ष तुरुंगात जाणार

मुंबई : रिअल मादरिडचा स्टार फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डो स्पेनच्या कर आधिकाऱ्यासोबत टॅक्स चोरी करण्याच्या प्रकरणात दोन वर्षासाठी तुरुंगात जाणार आहे. तुरुंगात जाण्यासाठी तो तयार झाला आहे. याशिवाय क्रिस्टियानो रोनाल्डोवर 18.8 मिलियन यूरो (21.8 मिलियन डॉलर)चा दंड देखील लागणार आहे.

स्पॅनिश कायद्यानुसार तो तुरुंगात न जाता देखील शिक्षा भोगू शकतो. 33 वर्षाच्या फुटबॉलरवर 14.7 मिलियन यूरोचा टॅक्स चोरल्याचा आरोप आहे. पण आपल्या एजेंटच्या माध्यमातून त्याने हे आरोप फेटाळले आहेत.