मुंबई : टीम इंडियातील माजी उत्कृष्ट खेळाडू सचिन तेंडूलकर आणि युवराज सिंग यांचं सोशल मीडियासोबत चांगल नातं जमल आहे. तसेच युवराज आणि सचिन सलग सोशल मीडियावर मस्ती करताना पाहायला मिळतात. सध्या युवराज सिंगने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये सचिन आणि युवराज पीपीई किटमध्ये पाहायला मिळाला.
युवराज सिंग फोटो शेअर करताना म्हणाला, आम्ही रायपूरमध्ये प्रवेश केला आहे. तर रोड सेफ्टीच्या मालिकेत आपली सेफ्टी खूप आवश्यक आहे. मात्र सचिन तेंडूलकर रोड सेफ्टीमध्ये ब्रांड एम्बेसडर आहे. रोड सेफ्टी वर्ल्ड मालिकेची सुरुवात मागील वर्षी करण्यात आली होती. परंतू कोरोना महामारी संकटामुळे ही टूर्नामेंटला रद्द करुन पूढे ढकलण्यात आली होती.
विशेष म्हणजे रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज (Road Safety World Series T20 2021) 5 मार्चपासून खेऴण्यात येणार आहे. तर पून्हा एकदा खेऴपट्टीवर उत्कृष्ट खेऴाडूंमध्ये विरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर आणि ब्रिटिश खेळाडू खेळताना पाहायला मिळणार आहे. मात्र रोड वर्ल्ड सेफ्टी टूर्नामेंट मालिकेत इंडिया लीजेंड्स कर्णधार सचिन तेंडुलकर. युवराज सिंग, विरेंद्र सेहवाग, प्रज्ञान ओझासारखे उत्कृष्ट खेळाडू रायपूर स्टेडियममध्ये पोहचले आहे.
ज्यामध्ये इंग्लंड, बांगलादेश, दक्षिण आफ्रीका आणि टीम इंडियामधील लीजेंड्स खेऴाडू रायपुरमध्ये खेळताना पाहायला मिळतील. हॉटेलमध्ये प्रवेश करताना सर्व खेळांडूची कोरोना टेस्ट केली जाणार आहे.
टूर्नामेंटमधील 6 टीम
रोड सेफ्टी वर्ल्ड मालिकेत, इंग्लंड, दक्षिण आफ्रीका, श्रीलंका, वेस्टइंडीज, बांगलादेश आणि यजमान भारत या 6 टीम टूर्नामेंटमध्ये भाग घेणार आहे. तर या टूर्नामेंटमध्ये सचिन तेंडूलकर, वीरेंद्र सहवाग, ब्रायन लारा, तिलकरत्ने दिलशान, जोंटी रोड्स आणि केविन पीटरसनसारखे उत्कृष्ट आणि महान खेळाडू खेऴताना पाहायला मिऴणार आहे.
रायपूरमधील 65 हजार प्रेक्षकाची क्षमता असलेल्या शहीद वीर नारायण सिंह इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियममध्ये टूर्नामेंट खेळण्यात येणार आहे. या टूर्नामेंटची सुरुवात 5 मार्च ते 21 मार्च दरम्यान असणार आहे.