मुलाबद्दल Sania Mirza ला सतावतेय 'ही' खंत, फोटो पोस्ट करत म्हणाली...

एकीकडे आईचं कर्तव्य तर दुसरीकडे कामाची बांधिलकी... मुलाबद्दल सानियाला सतावते खंत, म्हणाली...   

Updated: Jun 19, 2022, 09:31 AM IST
मुलाबद्दल  Sania Mirza ला सतावतेय 'ही' खंत, फोटो पोस्ट करत म्हणाली...  title=

मुंबई : भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक यांनी 12 एप्रिल 2010 साली लग्न केलं. लग्नानंतर सानियाने एका गोंडस मुलाला जन्म दिला.  सानिया आणि शोएबच्या मुलाचं नाव इजान मिर्झा आहे. सानिया कायम मुलासोबत फोटो पोस्ट करत असते. आई झाल्यानंतर सानियाच्या मनात कायम एक खंत असते, ती म्हणजे एकीकडे मातृत्व, तर दुसरीकडे कामाची बांधिलकी. आता देखील मुलगा आणि कामामध्ये सानिया अडकली आहे. 

मातृत्वाचं कर्तव्य आणि कामाची बांधिलकी यामुळे अनेकदा सानियाचं मुलाकडे दुर्लक्ष होतं. आता देखील असचं काही झालं आहे. सानियाने मुलाचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. फोटोमध्ये इजान फार गोंडस दिसत आहे. 

17 जून 2022 रोजी, सानिया मिर्झाने सोशल मीडियावर इजानचा एक फोटो पोस्ट केला आहे. इजान त्याचे बालवाडीचं शिक्षण पूर्ण केल्याच्या आनंदात सानियाने लेकाचा फोटो पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे. 

फोटो पोस्ट करत सानियाने कॅप्शनमध्ये, 'माझा मुलगा आज नर्सरीतून पदवीधर झाला आहे. मी एक अभिमानास्पद आई आहे.' असं लिहिलं आहे. सध्या सानियाची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

मुलाने नर्सरीतील शिक्षण पूर्ण केल्यानंतर सानिया म्हणते, 'मी इंग्लंडमध्ये खेळत आहे आणि माझा मुलगा आज पदवीधर झाला. मुलाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणाचा मी भाग होऊ शकले नाही. दुर्दैवाने आपण सोबत नाही. माझ्या मनात ही खंत कायम राहिल. 

पुढे सानिया म्हणते, 'गोष्टींची जाणीव असणे आणि स्वतःला माफ करणे फार महत्त्वाचं आहे. आई म्हणून कितीही केलं तरी, ते  पुरेसे नाही. मी स्वतःला नशीबवान मानते मला माझ्या कुटुंबाची पूर्ण साथ आहे.'

'कुटुंबामुळे मी माझ्या स्वप्नांचा पाठलाग करु शकते. माझ्या बाळाचा मला अभिमान आहे...' असं देखील सानिया यावेळी म्हणाली.