सानिया मिर्झाची बहिण या क्रिकेटपटूच्या मुलाशी लग्न करणार!

सानिया मिर्झाची बहिण अनम मिर्झा हिचं लग्न ठरलं आहे.

Updated: Oct 7, 2019, 09:02 PM IST
सानिया मिर्झाची बहिण या क्रिकेटपटूच्या मुलाशी लग्न करणार! title=

मुंबई : सानिया मिर्झाची बहिण अनम मिर्झा हिचं लग्न ठरलं आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीनचा मुलगा असदशी अनमचं लग्न होणार आहे. डिसेंबरमध्ये या दोघांचं लग्न होईल, असं सानिया मिर्झाने सांगितलं आहे. आम्ही नुकतेच पॅरिसहून आलो आहोत आणि या लग्नासाठी आम्ही उत्साही आहोत, असं सानिया म्हणाली.

IPL 2019: सानिया मिर्झाची बहिण या क्रिकेटपटूच्या मुलाशी लग्न करणार!

सानिया मिर्झापेक्षा वयाने ७ वर्ष लहान असलेली अनम ही व्यवसायाने फॅशन डिझायनर आहे. याआधीही अनम आणि असद यांच्या रिलेशनशीपबद्दल चर्चा झाल्या होत्या. सानिया मिर्झानेही या दोघांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला होता. 'फॅमिली' असं कॅप्शन सानियाने या फोटोला दिलं होतं. सप्टेंबर महिन्यात अनमने इन्स्टाग्रामवर फोटोही शेयर केले होते.

anam mirza who sister of sania mirza spotted with Asad Azharuddin

अनमने याआधी हैदराबादचा व्यावसायिक अकबर रशीद याच्याशी २०१६ मध्ये लग्न केलं होतं. हे लग्न फार काळ टिकलं नाही. मागच्या वर्षी दोघांनी घटस्फोट घेतला. यानंतर अनम आणि असद यांच्यातली जवळीक वाढली.