क्रीडा क्षेत्रातील मोठी बातमी! कॉमनवेल्थ गेम्समधून हॉकी, क्रिकेट, कुस्तीसह 13 खेळ काढले... का घेतला असा निर्णय?

Commonwealth Games 2026 : अनेक अडचणींवर मात करत कॉमनवेल्थ गेम्स  2026 अखेर स्कॉटलँडच्या ग्लासगो इथं होणार हे निश्चित झालं आहे. बजेटच्या कारणाने व्हिक्टोरियाने यजमानपद घेण्यास नकार दिला आहे. आता कॉमनवेल्थमधून मोठी बातमी समोर आली आहे.    

राजीव कासले | Updated: Oct 22, 2024, 02:09 PM IST
क्रीडा क्षेत्रातील मोठी बातमी! कॉमनवेल्थ गेम्समधून हॉकी, क्रिकेट, कुस्तीसह 13 खेळ काढले... का घेतला असा निर्णय? title=

Commonwealth Games 2026: कॉमनवेल्थ गेम्स 2026 अखेर स्कॉटलँडच्या ग्लासगो (Glasgow) इथं होणार असल्याचं निश्चित झालं आहे. ऑस्ट्रेलियामधील व्हिक्टोरिाय शहराने यजमानपदासाठी नकार दिल्यानंतर स्पर्धेसाठी नव्या ठिकाणाचा शोध घेतला जात होता. अनेक अडचणींचा सामना करत अखेर ग्लासगो इथली जागा निश्चित करण्यात आली. पण ही स्पर्धा भारतीय क्रीडा चाहत्यांसाठी निराशाजनक ठरणारी आहे. कारण या स्पर्धेत भारतीय खेळाडू हक्काची पदकं मिळवू शकतील असे खेळचं काढून टाकण्यात आले आहेत. 

हे 13 खेळ कॉमनवेल्थमधून काढले
कॉमनवेल्थ स्पर्धेत  (Commonwealth Games 2026) भारताची कामगिरी नेहमीच चांगली झाली आहे. विशेषत: हॉकी, क्रिकेट, कुस्ती, नेमबाजी आणि बॅडमिंटन सारख्या गेम्समध्ये भारतीय खेळाडू हक्काची पदकं मिळवतात. पण हेच खेळ कॉमनवेल्थ गेम्समधून काढून टाकण्यात आले आहेत. तब्बल 13 गेम्स कॉमनवेल्थ गेम्समध्ये नसणार आहेत. यात हॉकी, क्रिकेट, रग्बी सेवन, डायव्हिंग, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, रोड सायकलिंग, माऊंटेनबाईक, रिदमिक जिम्नॅस्टिक, स्क्वॅश, टेबल टेनिस, पॅरा टेबल टेनिस, ट्रायथलॉनय पॅरा ट्रायथलॉन आणि कुस्ती.