ओव्हल : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेला विजयासाठी ३०० धावांची गरज आहे.
श्रीलंकेने टॉस जिंकत दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीसाठी निमंत्रण दिले. द. आफ्रिकेने ५० षटकांत ६ गडी गमावत २९९ धावा केल्यात.
आफ्रिकेच्या हाशिम आमलाने शानदार १०३ धावांची खेळी केली. तर फाफ डू प्लेसिसने ७५ धावांची जबरदस्त खेळी केली. जे पी ड्युमिनी ३८ धावांवर नाबाद राहिला. श्रीलंकेकडून प्रदीन नुवाने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.