कोलकाताविरुद्ध ब्रावोच्या नावावर खराब रेकॉर्डची नोंद

चेपॉक स्टेडियमवर मंगळवारी चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील झालेल्या सामन्यात चेन्नईने २०३ धावांचे लक्ष्य ५ विकेट राखत पूर्ण केले. 

Updated: Apr 12, 2018, 12:51 PM IST
कोलकाताविरुद्ध ब्रावोच्या नावावर खराब रेकॉर्डची नोंद title=

चेन्नई : चेपॉक स्टेडियमवर मंगळवारी चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील झालेल्या सामन्यात चेन्नईने २०३ धावांचे लक्ष्य ५ विकेट राखत पूर्ण केले. चेन्नईचा हा सलग दुसरा विजय आहे. या स्पर्धेत चेन्नईने दुसऱ्यांदा यशस्वीपणे २००हून अधिक धावांच्या आव्हानाचा पाठलाग केला. याआधी हा रेकॉर्ड पंजाबने केला. 

पंजाबने तीन वेळा २००हून अधिक धावांच्या आव्हानाचा पाठलाग केला. यादरम्यान, ब्रावोच्या नावावर खराब रेकॉर्डची नोंद केली. मंगळवारी ब्रावोने चेन्नईविरुद्ध खराब गोलंदाजी केली. त्याने ३ ओव्हरमध्ये ५० धावा दिल्या आणि एकही विकेट घेतला नाही. त्याच्या गोलंदाजाीवर कोलकाताच्या फलंदाजांनी ७ षटकार ठोकले. 

यासोबतच टी-२० स्पर्धेत त्याच्या चेंडूवर षटकारांची संख्या १०७ झाली आणि त्याच्या नावावर खराब रेकॉर्डची नोंद झाली. सर्वाधिक षटकार देणाऱ्यांच्या यादीत ब्रावोने अव्वल स्थान पटकावले. त्याने याबाबतीत भारताचा माजी कर्णधार प्रवीण कुमारलाही मागे टाकले. प्रवीणच्या चेंडूवर या टी-२० स्पर्धेत १०४ षटकार ठोकले गेले होते. 

यासोबतच या स्पर्धेत आणखी एक नवा इतिहास रचला गेला. आतापर्यंतच्या या स्पर्धेच्या सीझनमध्ये ५ सामने खेळवण्यात आले. या पाचही सामन्यांत दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी सामने जिंकलेत. याआधी २०१६च्या हंगामाच्या सुरुवातीला सलग तीन सामन्यांमत दुसऱ्या डावात फलंदाजी करणारे संघ जिंकले होते. 

आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये कोण विजयी 
पहिला सामना - मुंबई विरुद्ध चेन्नई - चेन्नईचा 1 विकेट राखून विजय. (दुसरा डाव)

दुसरा सामना - पंजाब विरुद्ध दिल्ली - पंजाबचा ६ विकेट राखून विजय (दुसरा डाव)

तिसरा सामना - कोलकाता विरुद्ध बेंगलुरु - कोलकाता 4 विकेट राखून विजयी (दुसरा डाव)

चौथा सामना - हैदराबाद विरुद्ध राजस्थान - हैदराबादचा ९ विकेट राखऊन विजय(दुसरा डाव)

पाचवां सामना - कोलकाता विरुद्ध चेन्नई - चेन्नई 5 विकेट राखून विजयी(दुसरा डाव)

मंगळवारी झालेल्या या सामन्यात कोलकाताने टॉस हरल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत ६ विकेट गमावताना २०२ धावा केल्या आणि चेन्नईसमोर २०३ धावांचे आव्हान ठेवले होते. चेन्नईने हे आव्हान एक चेंडू राखत आणि ५ विकेट गमावताना पूर्ण केले.