SL vs IND 2nd T20: दुसऱ्या सामन्यासाठी सूर्या वापरणार जुना फॉर्म्युला; 'अशी' असेल भारताची प्लेईंग 11

SL vs IND 2nd T20 Playing XI: T20 सिरीजमधील दुसरा सामना आज पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने पहिला T20 सामना 43 रन्सने जिंकला होता.

सुरभि जगदीश | Updated: Jul 28, 2024, 03:46 PM IST
SL vs IND 2nd T20: दुसऱ्या सामन्यासाठी सूर्या वापरणार जुना फॉर्म्युला; 'अशी' असेल भारताची प्लेईंग 11 title=

SL vs IND 2nd T20 Playing XI: सध्या टीम इंडिया श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. यावेळी भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये टी-20 सिरीज सुरु आहे. या सिरीजचा पहिला सामना भारताने जिंकला असून आज संध्याकाळी दुसरा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकल्यास टीम इंडिया सिरीज जिंकणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी सूर्यकुमार यादव पूर्ण प्रयत्न करणार आहे. अशावेळी दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी प्लेईंग 11 कशी असणार आहे, यावर एक नजर टाकूया.

T20 सिरीजमधील दुसरा सामना आज पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने पहिला T20 सामना 43 रन्सने जिंकला होता. तर दुसरा सामना आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.०० वाजता खेळवला जाईल.

शिवम दुबे पुन्हा बसणार बाहेर?

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यासाठी टीम इंडियामध्ये फारसे बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे टीम इंडिया त्याच बदलासह मैदानात उतरू शकते. त्यामुळे या वेळी देखील वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, खलील अहमद आणि शिवम दुबे हे दुसऱ्या टी-20 सामन्यातूनही बाहेर बसवण्याची शक्यता आहे. 

उपकर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल पुन्हा एकदा ओपनिंगला उतरणार आहे. यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव स्वतः तिसऱ्या क्रमांकावर पदभार स्वीकारेल. चौथ्या क्रमांकावर ऋषभ पंत फलंदाजी करणार आहे. त्यानंतर रियान पराग, हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंग मैदानावर उतरतील. स्पिनर अक्षर पटेल आणि स्पिनर रवी बिश्नोई यांना टीममध्ये स्थान मिळेल. स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज म्हणून अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांचा देखील टीममध्ये समावेश केला जाईल.

दुसऱ्या T20 साठी भारताची संभाव्य प्लेइंग 11

शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋषभ पंत, रियान पराग, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज.

दुसऱ्या T20 साठी श्रीलंकेची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कुसल परेरा, कामिंदू मेंडिस, चारिथ असलंका (कर्णधार), वानिंदू हसरंगा, दासुन शनाका, महिश तिक्शाना, मथिशा पाथिराना, असिथा फर्नांडोस, अशिथा फर्नांडस.