टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघ जाहीर, 'या' दोन देशांना मिळालं यजमानपद!

वर्ल्ड कप 2024 मध्ये या संघांनी मिळवला डायरेक्ट प्रवेश!

Updated: Nov 6, 2022, 09:15 PM IST
 टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघ जाहीर, 'या' दोन देशांना मिळालं यजमानपद! title=

T-20 World cup 2024 : येत्या दोन वर्षांनी म्हणजेच 2024 (T-20 World cup 2024) साली होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर झाले आहेत. या वर्ल्ड कपचं यजमानपद हे दोन देशांकडे सोपवण्यात आल्याची माहिती समजत आहे. अमेरिका (USA) आणि वेस्ट इंडिज (West indies) या दोन देशांमध्ये वर्ल्ड कप खेळवण्यात येणार आहे. (T-20 World cup 2024 qualified Team sport marathi news)
 
यजमान असल्‍याने वेस्‍ट इंडिज आणि अमेरिका या स्‍पर्धेचा भाग असतील. तर भारत (india), पाकिस्तान (Pakistan), दक्षिण आफ्रिका (South Africa), न्यूझीलंड, इंग्लंड (England), ऑस्ट्रेलिया, श्रीलंका (Srilanka) आणि नेदरलँड (Nedarland) या विश्वचषकातील टॉप 8 संघांमध्ये सामील झाले आहेत. अफगाणिस्तान (Afghanistan) आणि बांगलादेश (Bangladesh) यांनाही या विश्वचषकात स्थान देण्यात आलं आहे.

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ESPNcricinfo (@espncricinfo)

T20 विश्वचषक 2022 च्या पहिल्या फेरीत, नेदरलँड्सने दोन सामने जिंकले आणि सुपर 12 च्या गट 1 मध्ये आपले स्थान निश्चित केले. पण या गटातही त्यांनी झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले आणि 4 गुणांसह गटात चौथे स्थान पटकावले. आज दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात नेदरलँड्सने प्रथम फलंदाजी करत इतिहास रचला. 

टी-20 वर्ल्ड कप 2024 वेस्‍ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये होणार आहे. या सामन्यांचे स्वरूप कसं असणार हे अधिकृतपणे ठरलेलं नाही. कारण शेवटच्या दोन विश्वचषकापूर्वी पहिल्या फेरीनंतर ही स्पर्धा सुपर 12 च्या फॉरमॅटमध्ये आयोजित करण्यात आली होती.