Cricket Australia scraps Afghanistan T20s : टी-20 सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार दिला आहे. यावर स्पष्टीकरण देत ऑस्ट्रेलियाने सांगितले की, अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं राज्य आहे. तालिबान शासन हे महिला आणि अल्पवयीन मुली यांचे मुलभूत हक्क आणि अस्तित्वावर स्वत:ची मालकी हक्क गाजवतात. महिला आणि मुलींना गुलामाची वागणूक देणाऱ्या तालीबान शासनाचा ऑस्ट्रेलिया निषेध करते. या आधीही ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार दिला होता.
भारतात एकदिवसीय विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान असा सामना रंगणार होता त्यावेळी ऑस्ट्रेलियाने तालिबानचं शासन असणाऱ्या अफगाणिस्तान संघाशी सामना खेळण्यास नकार दिला. गेल्या तीन वर्षात तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलिया संघाने तालिबानला न जुमानता नकार दिला.
याआधीसुद्धा झालेल्या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलिया संघ अफगाणिस्तानशी खेळला नव्हता.ऑस्ट्रेलिया संघाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. ऑस्ट्रेलिया संघाच्या म्हणण्यानुसार अफगाणिस्तानसोबत क्रिकेटचे कोणतेही सामने न खेळण्याबाबत ऑस्ट्रेलिया ,सरकारशी बोलून हा निर्णय घेण्यात आला आहे. तालिबानचं राज्य आल्यानंतर अफगणिस्तानात महिलांना गुलामासारखी वागणूक मिळू लागली. दुर्देवाची बाब म्हणजे अफगणिस्तानच्या क्रिकेट संघासाठी महिला संघ नाही. तालिबानने महिलांवरील अन्याय अत्याचार थांबवून क्रिकेटकरीता महिला संघाची निर्मिती करावी. पुरुषांप्रमाणे अफगाणिस्तानच्या महिलांनी ही क्रिकेटचे सामने खेळावेत असं मत ऑस्ट्रेलिया संघाने स्पष्ट केले आहे.
मागच्या वर्षी एकदिवसीय कसोटीसामन्यांपैकी तीन कसोटी सामने हे युएई येथे अफगणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा रंगणार होता,मात्र होणाऱ्या या तीन दिवस असणाऱ्या कसोटी मालिकेतून ऑस्ट्रेलियाने माघार घेतली.
जोपर्यंत तालिबान शासन अफगाणि महिसलांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देत नाही तोवर ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ अफगाणिस्तान सोबत कोणताही सामना खेळणार नाही. अशी स्पष्ट भुमिका ऑस्ट्रेलिया संघाने मांडली आहे. हिंसाचार आणि असुक्षितेसठी ओळखळी जाणारी दहशतवादी संघटना म्हणजे तालिबान शासन असं म्हटलं जातं. 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला. त्यानंतर महिलांचं आणि लहान मुलांचं होणारं शोषण वाढत गेलं. यामुळे अफगाणिस्तानमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण होत गेलं. याच पार्श्वभुमिवर ऑस्ट्रेलियाने तालिबानला न जुमानता अफगाणिस्तान क्रिकेट संघासोबत खेळण्यास नकार दिला.