T20 World Cup : जगभरातील क्रिकेटप्रेमींना आता उत्सुकता लागली आहे ती टी20 क्रिकेट वर्ल्ड कपची. ऑस्ट्रेलियात (Australia) होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत 16 संघांनी भाग घेतला आहे. टी20 क्रिकेटमध्ये सिक्स आणि फोरची (Six and Four) बरसात. या स्पर्धेत अनेक नवे विक्रम (Records) रचले जातील तर अनेक विक्रम मोडले जातील. आयसीसीच्या (ICC) गेल्या सात टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत (T20 World Record) असेच विक्रम रचले गेले आहेत आणि आता आठवी टी20 स्पर्धाही याला अपवाद नसणार. असाच एक अनोख विक्रम या स्पर्धेत नोंदवला जाणार आहे.
स्पर्धेतील 49वा सिक्स ऐतिहासिक
हा अनोका विक्रम असणार आहे सिक्सचा. स्पर्धेतील 49 वा सिक्स ऐतिहासिक ठरणार आहे. सहभागी झालेल्या 16 संघातील कोणताही खेळाडू स्पर्धेतील 49 वा सिक्स मारेल, त्या खेळाडूचं नाव क्रिकेटच्या इतिहासात कायमचं लक्षात ठेवलं जाईल.
T20 वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत 1951 सिक्स
T20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत 1951 सिक्स लगावले गेले आहेत. यात पहिल्या म्हणजे 2007 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 265 सिक्स मारले गेले होते. त्यानंतर
2009 टी20 वर्ल्ड कप - 166 सिक्स
2010 टी20 वर्ल्ड कप - 278 सिक्स
2012 टी20 वर्ल्ड कप - 223 सिक्स
2014 टी20 वर्ल्ड कप - 300 सिक्स
2016 टी20 वर्ल्ड कप - 314 सिक्स
2021 टी20 वर्ल्ड कप - 405 सिक्स
यात 2021 च्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदाच 400 हून अधिक म्हणजे 405 सिक्सची नोंद झाली. एकूण 7 टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत आतापर्यंत 1951 सिक्सची नोंद झाली आहे.
49 वा सिक्स का असणार ऐतिहासिक?
आता यंदाच्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत लगावला जाणारा 49 वा सिक्स का ऐतिहासिक असणार आहे हे जाणून घेऊया. क्रिकेटप्रेमींची इच्छा असेल या स्पर्धेत सिक्सची बरसात पहायला मिळावी. स्पर्धेतील अनेक खेळाडू सिक्सर किंग म्हणूव ओळखले जातात. पण 49 वा सिक्स मारणारा खेळाडू खऱ्याअर्थाने नशिबवान ठरणार आहे. कारण जसा 49 वा सिक्स लगावला जाईल तसा टी20 क्रिकेटच्या इतिहासात दोन हजार सिक्सचा टप्पा पूर्ण होईल.