T20 World Cup 2022 : टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये सर्वच सामने दमदार झाले. ग्रुप स्टेजमध्ये दोनवेळा वर्ल्ड कपवर नाव कोरणारा तगडा वेस्ट इंडिज संघ बाहेर झाला. त्यासोबतच आशिया कप जिंकणाऱ्या श्रीलंकेच्या संघालाही पहिल्या सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. आता सुपर 12 फेरी चालू असून अंतिम चारसाठी मोठी चुरस असलेली पाहायला मिळत आहे.
सुपर 12 मधील मोठे संघ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत यासारख्या संघांचा पराभव झाला. मात्र एक गोष्ट कोणाच्या लक्षात आली नाही ती म्हणजे मोठमोठ्या संघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र स्पर्धेमध्ये एक संघ आहे जो अजूनही अपराजित आहे. तो संघ दुसरा तिसरा कोणी नसून दक्षिण आफ्रिकेचा आहे.
ग्रुप दोनमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्या स्थानावर आहे. आफ्रिकेचा झिम्बाब्वेसोबत पहिला सामना होता मात्र पावसामुळे तो रद्द झाला. दुसरा सामना बांगलादेशसोबत होता त्यामध्ये 104 धावांनी आफ्रिकेने मोठा विजय मिळवला होता. त्यानंतरचा तिसरा सामना भारतीय संघासोबत होता. या सामन्यातही आफ्रिकेने पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय संपादित करत विजयी घोडदौड करत असलेल्या भारताचा पराभव करत थेट पॉईंट टेबलमध्ये टॉप मारला होता.
ग्रुप 1 मधील न्यूझीलंड संघ अपराजित होता मात्र आजच्या सामन्यामध्ये इंग्लंडने त्यांचा पराभव केला. आता ग्रुप 1 मध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. कारण पहिल्या तिन्ही संघाचे समान पॉईंट्स आहेत. जर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडचा पराभव झाल्यास श्रीलंकेचं उपांत्य फेरीचं दार उघडणार आहे. त्यामुळे पुढचे सामने खूप अटितटीचे ठरणार आहेत. नुसता विजय मिळवून चालणार नाहीतर चांगली धावगतीही राखावी लागणार आहे.