मुंबई : टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर (India Tour Of New Zealand 2022) आहे. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु आहे. या दरम्यान टीम इंडियासाठी गूडन्यूज आली आहे. टीम इंडियाचा स्टार बॉलर यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) मैदानात कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. बुमराहने एक प्रॅक्टीस करतानाचा व्हीडिओ शेअर केलाय. हा व्हीडिओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झालाय. बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे गेल्या 2 महिन्यांपासून टीममधून बाहेर आहे. (team india bowler jasprit bumrah is ready to comeback after injurey)
बुमराह शेअर केलेल्या व्हीडिओत जोमाने वर्कआऊट करताना दिसतोय. बुमराहला झालेली दुखापत ही स्वत: बुमराह आणि टीम इंडियाला चांगलीच महागात पडली होती. बुमराहची टीम इंडियाला वर्ल्ड कपमध्ये उणीव भासली होती. मात्र आता व्हीडिओ समोर आल्याने बुमराह दुखापतीतून सावरलेला दिसतोय. बुमराहची न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यात निवड करण्यात आलेली नाही.
श्रीलंका नववर्षात अर्थात जानेवारी 2023 मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात प्रत्येकी 3 सामन्यांची एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी बुमराहची निवड होणार का, याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.