मुंबई : भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या खेळाने आतापर्यंत स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. अनेक खेळाडूंची भारतीय क्रिकेट संघात निवड झाल्यानंतर त्यांचं संपूर्ण आयुष्य बदललं आहे. त्यामुळे त्यांना प्रसिद्धी सह मोठी फॅन फॉलोविंग देखील मिळाली आहे. त्यामुळे त्यांच्या आय़ुष्यातील घडामोडींवर चाहत्यांचं बारकाईन लक्ष असतं.
भारतीय क्रिकेट संघात असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांचे पहिले लग्न काही कारणामुळे यशस्वी होऊ शकले नाही. पण त्यांनी त्याच्या दुसऱ्या लग्नात बरीच वर्षे घालवली आहेत आणि आता आनंदी जीवन जगत आहे.
फलंदाज आणि यष्टीरक्षक दिनेश कार्तिकचे पहिले लग्न निकिताशी झाले. पण निकिता आणि तिचा मित्र क्रिकेटर मुरली विजय यांच्यातील प्रेम प्रकरण उघड झाल्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. 2015 मध्ये दिनेश कार्तिकने स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लीकलसोबत लग्न केले आणि आता दोघेही आनंदी आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज जवागल श्रीनाथने प्रथम ज्योत्स्नाशी लग्न केले. वर्ष 2007 मध्ये, सुमारे आठ वर्षांनी दोघे विभक्त झाले. काही वर्षांनी त्यांनी पत्रकार माधवी पत्रावलीशी लग्न केले आणि आता दोघे एकत्र आहेत.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने दोन विवाह केले. पहिले लग्न त्याने नौरीनशी लग्न केले. 1996 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर त्याने अभिनेत्री संगीता बिजलानीशी लग्न केले. पण हे लग्नही फार काळ टिकले नाही. 2010 मध्ये दोघे विभक्त झाले.
भारतीय क्रिकेट संघातील फलंदाज असलेल्या विनोद कांबळीने प्रथम बालपणीची मैत्रीण नील लुईसशी लग्न केले होते पण नंतर दोघांनी घटस्फोट घेतला. यानंतर विनोद कांबळीने मॉडेल अँड्रिया हेविटशी लग्न केले आणि आता दोघांना 11 वर्षांचा मुलगा आहे.
आजच भारतीय क्रिकेट विश्वाला हादरा देणारी एक बातमी सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. भारतीय क्रिकेट संघातील सलामीचा फलंदाज शिखर धवन आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी यांच्या आनंदी वैवाहिक नात्याला आता तडा गेल्याचं म्हटलं जात आहे. एका सोशल मीडिया पोस्टमुळं ही धक्कादायक माहिती समोर आल्याचं कळत आहे.