आशिया कप जिंकून देणाऱ्या खेळाडूवर क्रिकेट बोर्डाची मोठी कारवाई

ऑस्ट्रेलियामधील टी-20 वर्ल्ड कपमध्ये केलेल्या चुकीमुळे बोर्डाने घेतला मोठा निर्णय!

Updated: Nov 23, 2022, 09:51 PM IST
आशिया कप जिंकून देणाऱ्या खेळाडूवर क्रिकेट बोर्डाची मोठी कारवाई title=

Chamika Karunaratne Suspended : क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. यंदाच्या आशिया कपवर नाव कोरणाऱ्या श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्यांच्याच एका खेळाडूवर मोठी कारवाई केली आहे. क्रिकेटच्या सर्व प्रकारामध्ये खेळण्यावर अष्टपैलू चमिका करुणारत्नेवर 1 वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. त्यासोबतच त्याच्यावर 5 हजार अमेरिकन डॉलर म्हणजेच 4 लाखांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. (chamika karunaratne suspended 1 year ban latest marathi sport news)

नुकत्याच पार पडलेल्या टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये करुणारत्नेने बोर्डाच्या नियमांचं उल्लंघन केल्याने त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अष्टपैलू चमिका करुणारत्नेवर T20 विश्वचषकादरम्यान खेळाडूंच्या करारांतर्गत अनेक कलमांचे उल्लंघन केल्याबद्दल सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये त्याच्यावर एक वर्षाची बंदी घातली आहे.