विराट-अनुष्कासोबत नेमप्लेटवर वामिकाचं नाव, पाहा सुंदर नेमप्लेट

विरुष्काची नेमप्लेट चर्चेत 

Updated: Mar 28, 2021, 09:57 AM IST
विराट-अनुष्कासोबत नेमप्लेटवर वामिकाचं नाव, पाहा सुंदर नेमप्लेट

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma)अनेक काळापासून मोठ्या पडद्यापासून लांब आहे. मात्र ती सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. काही महिन्यांपूर्वी अनुष्काने लेक वामिकाला जन्म दिला आहे. वामिकाचे काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहे. मार्च महिन्यात वामिका दोन महिन्यांची झाली. मात्र अजून वामिकाचा फर्स्ट लूक पाहायला मिळाला नाही. 

11 जानेवारी रोजी अनुष्काने बाळाला जन्म झाला. अनुष्का गरोदरपणात अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. लेकीच्या जन्मानंतर सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत तिने 'वामिका' असं नाव ठेवलं. सध्या अनुष्का-विराटच्या घरातील एक नेमप्लेट चर्चेत आली आहे. या नेमप्लेटचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. 

अशी आहे नेमप्लेट 

आता विराट कोहली इंग्लंड विरुद्धच्या सीरीजमध्ये बिझी आहे. भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये राहत आहेत तेथे त्यांना घरगुती वातावरण देण्याचा प्रयत्न केला आहे. अशात त्यांना नेमप्लेटसोबत रुम नंबर दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विराटच्या रुम बाहेर एक खास नेमप्लेट लावली आहे. ज्यामध्ये विराट कोहली, पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिका अशी तिघांची नावं आहेत. 

 भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या वन डे सामना नुकताच पुण्यात पार पडला. या सामन्या इंग्लंड संघानं सामना जिंकत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. या वन डे सामन्यादरम्यान अंपायरनं दिलेल्या निर्णयबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. इतकच नाही तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली देखील संतापला होता. 

दुसऱ्या वन डे सामन्यादरम्यान नेमकं काय घडलं? 

इंग्लंडच्या फलंदाजीदरम्यान 26 व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारच्या चेंडूवर फलंदाजी केली. त्यावेळी कुलदीप यादव फिल्डिंग करत होता. स्टोक्स धावा काढण्यात व्यस्त असताना त्याला रन आऊट करण्यात आलं. मात्र अंपायरनं रन आऊटचा निर्णय न देता खेळ पुढे सुरू ठेवण्यास सांगितला.