T20 World Cup Joshua Little Takes Hattrick : टी20 वर्ल्डकप 2022 (T20 World Cup 2022) हे अधिक रंगतदार होतं चालं आहे. या स्पर्धेमध्ये अनेक रेकॉर्ड तोडले जात आहे. विराट कोहलीने तर विक्रम (Virat Kohli records) करण्याचा सपाटा लावला आहे. पहिले त्याने जयवर्धनेचा सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मोडला आता रविवारी 6 नोव्हेंबर (Sunday 6 November 2022) होणाऱ्या मॅचमध्ये सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्यासाठी (sachin tendulkar huge record) सज्ज झाला आहे. आज 4 नोव्हेंबर 2022 शुक्रवारी न्यूझीलंड आणि आयर्लंड (Zealand Vs Ireland ) यांच्यामध्ये सामना खेळला गेला. मध्ये एका खेळाडूने इतिहास रचला (player made history) आहे.
आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जोशुआ लिटलने इतिहास रचला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात जोशुआ लिटलने शानदार हॅटट्रिक घेतली. त्याने प्रथम केन विल्यमसनला आपला बळी बनवले, त्यानंतर लिटिलने जिमी नीशमची विकेट घेतली आणि त्यानंतर मिचेल सँटनरला बाद करून हॅट्ट्रिक पूर्ण केली. न्यूझीलंडच्या डावातील 19 षटकांत त्याने ही हॅटट्रिक घेतली. (VIDEO T20 World Cup Joshua Little Hattrick nmp)
ब्रेट ली वि बांगलादेश केप टाउन 2007
कर्टिस कॅम्पर विरुद्ध नेदरलँड्स अबू धाबी 2021
वानिंदू हसरंगा वि दक्षिण आफ्रिका शारजा 2021
कागिसो रबाडा विरुद्ध इंग्लंड शारजा 2021
कार्तिक मयप्पन विरुद्ध श्रीलंका गिलॉन्ग 2022
जोश लिटल 2022 जोश लिटल 2022
T20 वर्ल्ड कपमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो जगातील सहावा आणि आयर्लंडचा दुसरा गोलंदाज आहे. त्याच्या आधी कर्टिस कॅम्फरने 2021 च्या मोसमात नेदरलँड्सविरुद्ध ही कामगिरी केली होती. इतकंच नाही तर एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी-20 विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाचा विक्रमही जोशुआ लिटलच्या नावावर झाला आहे.
— Vaishnavi Iyer (@Vaishnaviiyer14) November 4, 2022
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक T20I विकेट घेणारे खेळाडू (Players with most T20I wickets in a calendar year)
39 जोश लिटल (2022)
38 संदीप लामिछाने (2022)
36 वनिंदू हसरंगा (2021)
36 तबरियाज शम्सी (2021)
35 दिनेश नाकर्णी (2021)
35 भुवनेश्वर कुमार (2022)