अनुष्काआधी विराट कोहली या अभिनेत्रीला करायचा डेट, फोटो पाहून अनुष्कालाही विसराल

आयपीएल दरम्यान आता विराट कोहली आपल्या Ex गर्लफ्रेंडमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Updated: Sep 28, 2021, 09:26 PM IST
अनुष्काआधी विराट कोहली या अभिनेत्रीला करायचा डेट, फोटो पाहून अनुष्कालाही विसराल

मुंबई: आयपीएल दरम्यान आता विराट कोहली आपल्या Ex गर्लफ्रेंडमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माआधी विराट कोहली एका प्रसिद्ध मॉडेलला डेट करत होता. या मॉडेलचे फोटो सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल झाले आणि कोहलीही त्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. 

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं रिलेशन खूप चर्चेत होतं. त्यांची जोडी खूप सुंदर आहे. पण विराट अनुष्काआधी ब्राझीलच्या मॉडेल आणि अभिनेत्री इजाबेल लिटे डेट करत होता. विराट आणि इसाबेल यांच्या डेटच्या खूप चर्चाही रंगल्या होत्या. 

ब्राझिलियन मॉडेल इजाबेल लिटे आपल्या सौंदर्यामुळे जगभरात प्रसिद्ध आहे. त्यावेळी विराट कोहलीही क्रिकेटमध्ये चांगल्या कामगिरीमुळे चर्चेत होता. सौंदर्यवती इजाबेल विराटच्या प्रेमात वेडी होती. विराट आणि अनुष्काचं लग्न होण्याआधी हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा देखील होती. यासंदर्भात मीडियामध्ये देखील खूप चर्चा आणि बातम्याही चालल्या होता. 

या दोघांच्या डेटिंगसंदर्भात 2013 मध्ये बऱ्याच चर्चा रंगल्या. वर्षभर एकमेकांना डेट केल्यानंतर मात्र दोघांमध्येही काही कारणांनी दुरावा आल्याची चर्चा होती. ब्रेकअपनंतर एका मुलाखती दरम्यान इजाबेलनं यासंदर्भात पहिल्यांदाच समोर येऊन बोलली होती. 

इजाबेलनं एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला होता. 'आम्ही दोघंही एकमेकांना डेट करत होतो. हे नातं दोघांच्या सहमतीनं आम्ही तोडलं आहे.' त्यांच्यात नेमका का दुरावा आला यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. इजाबेल आणि विराट यांच्यातील नातं संपुष्टात आल्यानंतर विराट कोहलीच्या आयुष्यात अनुष्का शर्मा आली. या दोघांनी 11 डिसेंबर 2017 मध्ये लग्न केलं.