मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात आज तिसरा आणि निर्णयाक वनडे सामना रंगणार आहे. टीम इंडियाने आतापर्यंत इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी केली आहे. वनडे सिरीज 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघ जोर लावणार आहेत. भारताच्या टीममध्ये विराट कोहली शेवटच्या या महत्त्वाच्या सामन्यात 2 बदल करु शकतो. मिडल ऑर्डर आणि एक बॉलर विराट बदलू शकतो.
ओपनिंग: ओपनिंगची जबाबदारी रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यावर असणार आहे. दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत टीमला चांगली सुरुवात करुन दिली आहे. पण धवन मोठी इनिंग खेळण्यात अपयशी ठरत आहे. रोहितने पहिल्या सामन्यात शतक ठोकलं असलं तरी त्याला या अंतिम सामन्यात मोठी इनिंग खेळण्याची गरज आहे.
मिडल ऑर्डर: मिडल ऑर्डरमध्ये टीममध्ये एक बदल होऊ शकतो. के एल राहुलच्या जारी दिनेश कार्तिकला संधी दिली जाऊ शकते. तीसऱ्या नंबरवर विराट कोहली, चौथ्या नंबरवर सुरेश रैना, पाचव्या नंबरवर दिनेश कार्तिक, सहाव्या नंवबरवर धोनी, सातव्या नंबरवर हार्दिक पंड्या खेळण्यासाठी येऊ शकतो.
बॉलिंग : टीममध्ये आणखी 1 बदल बॉलरच्या बाबतीत होऊ शकतो. भुवनेश्वर कुमारला पुन्हा संधी मिळू शकते. कुलदीप यादव, उमेश यादव आणि युजवेंद्र चहल हे देखील संघात राहतील. स्पिनर्सवर या सामन्यात मोठी जबाबदारी असणार आहे.
भारतीय टीम (शक्यता): रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, एम एस धोनी, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, उमेश यादव.