मुंबई: भारताचा धडाकेबाज कर्णधार विराट कोहली सध्या आपल्या कुटुंबियांसोबत बराच काळ एकत्र घालवतो. तसेच, काही निवडक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्याबाबतचे अपडेटही तो आपल्या चाहत्यांना देतो. विराटने असाच एक फॅमेली फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पण, हा फोटो पाहून चाहत्यांनी विराटला एक हटके प्रश्न विचारत विकेट घेण्याच प्रयत्न केला. सोशल मीडियात पोस्ट केलेल्य फोटोत विराट आपल्या फॅमेलीसोबत दिसतो पण, त्यात अनुष्का मात्र कुठेच दिसत नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना अनुष्काची आठवण झाली आणि त्यांनी अनुष्काबाबत विचारले.
दरम्यान, विराटने जो फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे त्या फोटोत, विराटची आई सरोज आणि बहिण भावना दिसत आहेत. आई सरोज आणि बहिण भावना या विराटला भेटण्यासाठी मुंबईला आल्या असतानाचा हा फोटो अल्याचे समजते. हा फोटो विराटने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात विराट गाडीमध्ये पुढे बसला आहे. तर, पाठीमागच्या सीटवर त्याची आई आणि बहिण बसल्या आहेत. सोबत बहिणीची दोन मुलेही आहेत.
विराटने हा फोटो शेअर करतातच त्याच्या चाहत्यांना हा फोटो काहीसा अपूर्ण वाटला. कारण, या फोटोत अनुष्का दिसत नही. त्यामुळे हा फोटो पाहून चाहत्यांनी विराटला प्रश्न विचारला आहे की, अनुष्का भाभी कुठे आहे.? विराट कोहलीचा विवाह अनुष्का शर्मासोबत गेल्याच वर्षी झाला. अनुष्का सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यग्र आहे.