WPL 2024 Final : कोण उचलणार WPL ची ट्रॉफी, लेडी सेहवागसमोर स्मृती मानधनाचं आव्हान!

DC W vs RCB W, WPL 2024 Final : दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आरसीबी हा सामना आज रंगणार असून दोन्ही संघापैकी कोणता संघ पहिल्यांदा WPL ची ट्रॉफी जिंकून इतिहास रचणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

सौरभ तळेकर | Updated: Mar 17, 2024, 06:40 PM IST
WPL 2024 Final : कोण उचलणार WPL ची ट्रॉफी, लेडी सेहवागसमोर स्मृती मानधनाचं आव्हान!  title=
DC W vs RCB W, WPL 2024 Final

RCB VS Delhi Capital : डब्ल्यूपीएलचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात (WPL 2024 Final) पोहोचला आहे. दिल्लीच्या अरूण जेठली मैदानावर दिल्ली विरुद्घ आरसीबी (DC vs RCB) यांच्यात फायनल सामना खेळवला जाईल. दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals Women) आतापर्यंत आठ सामने खेळले असून सहा सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (Royal Challengers Bangalore Women) चार सामन्यांचा विजय खेचून आणला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आरसीबी हा सामना आज रंगणार असून दोन्ही संघापैकी कोणता संघ पहिल्यांदा WPL ची ट्रॉफी जिंकून इतिहास रचणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

महिला प्रिमियर लीगचा हा दुसरा सीझन असून पहिल्या सीझनमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघ उपविजेता ठरला होता. कर्णधार स्मृती मंधानाच्या नेतृत्त्वाखाली शुक्रवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली. आता दोन्ही संघात रंगतदार सामना पहायला मिळणार आहे. 

महिला प्रिमियर लीगमध्ये दोन्ही संघाने दमदार कामगिरी बजावली. दिल्लीच्य़ा अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी हा सामना रंगणार आहे. घरच्याच स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सला खेळण्याचा फायदा मिळू शकतो. याआधी दिल्लीने अरुण जेटली स्टेडियमवर चार सामने खेळले आहेत. चारपैकी तीन सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विजयी ठरली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात दिल्लीचं पारडं जड दिसत आहे.

आजचा सामना आरसीबीसाठी महत्त्वाचा आहे. फायनलमध्ये धडकल्यावर आजपर्यंत आरसीबीला ट्रॉफीबाबत कायमच हुलकावणी मिळाली. त्यामुळे ट्रॉफीमिळवण्याचं विराटचं स्वप्नं स्मृती मानधाना पुर्ण करू शकेल का? यावर आता आरसीबीच्या चाहत्य़ांचं लक्ष केंद्रित आहे.  

स्मृती मानधाना महिला प्रिमियर लीगचं नेतृत्व करत असली तरी, मुंबई इंडियन्सचा पराभव करत आरसीबीने फायनलला धडक मारण्यात एलिस पेरीच्या दमगार खेळीचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे एलिस पेरीची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली होती. आता ऑस्ट्रेलियन एलिस पेरीला पुन्हा एकदा आरसीबीसाठी झुंज द्यावी लागणार आहे.

दिल्ली कॅपिटल्स महिला संघ - मेग लॅनिंग (C), तानिया भाटिया (WK), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, मिन्नू मणी, अश्वनी कुमारी, अपर्णा मंडल, तितस साधू , स्नेहा दीप्ती, ॲनाबेल सदरलँड, लॉरा हॅरिस, पूनम यादव.

आरसीबीचा महिला संघ - स्मृती मानधना (C), रिचा घोष (WK), सोफी डिव्हाईन, एलिस पेरी, दिशा कासट, सोफी मोलिनक्स, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग, सिमरन बहादुरे, शुभा सतीश, सभिनेनी मेघना, नादिन डी क्लर्क, केट क्रॉस, एकता बिश्त.