IPL 2022: मुंबईच्या विजयावर आरसीबीच्या चाहत्यांची नजर; प्लेऑफमध्ये मिळवून देणार एन्ट्री

आयपीएल 2022 मध्ये आता प्लेऑफच समीकरण स्पष्ट होत चालेलय. गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आधीच प्लेऑफमध्ये (play off) पोहोचलीय. तर इतर तीन संघ कोणत्या असणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. 

Updated: May 17, 2022, 07:20 PM IST
IPL 2022: मुंबईच्या विजयावर आरसीबीच्या चाहत्यांची नजर; प्लेऑफमध्ये मिळवून देणार एन्ट्री title=

मुंबई : आयपीएल 2022 मध्ये आता प्लेऑफच समीकरण स्पष्ट होत चालेलय. गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आधीच प्लेऑफमध्ये (play off) पोहोचलीय. तर इतर तीन संघ कोणत्या असणार आहेत, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. तर तिथे मुंबईच्या विजयावरही आरसीबीची (Royal challengers  Banglore) एन्ट्री निर्भर असणार आहे. कारण जर मुंबई जिंकल्यासा आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा थेट फायदा होणार आहे.    

चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super King)आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेय. तर  मुंबईच्या संघाला त्यांचे उर्वरित दोन सामने खेळायचेत. बंगळुरूचे 14 गुण आहेत. परंतु, त्यांचा नेट रन रेट खूपच खराब आहे. त्यामुळं बंगळुरूला प्लेऑफसाठीचा आपला दावा मजबूत करण्यासाठी गुजरातविरुद्ध सामना जिंकावा लागेल. एवढेच नव्हेतर, मुंबईच्या संघाला त्यांच्या अखेरच्या सामन्यात दिल्लीला पराभूत करणं गजचेचं आहे. 

मुंबईचा संघ त्यांचा अखेरचा सामना 21 मे ला दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळणार आहे. या सामन्यात मुंबईच्या संघानं दिल्लीला पराभूत केल्यास बंगळुरूच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशा उंचावतील. तसेच बंगळुरूला त्यांच्या अखेरच्या सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत करणं अनिवार्य असेल. मात्र जर मुंबईनं दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना गमावला, तर बंगळुरूच्या प्लेऑफच्या शर्यतीत बाहेर पडू शकते.