Muneeba Ali: टी-20 वर्ल्डकपमध्ये (ICC Women's T20 World Cup) टीम इंडियाच्या महिला खेळाडूंनी सलग दुसरा सामना जिंकला आहे. भारत विरूद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) या सामन्यामध्ये टीम इंडियाने 6 विकेट्सने हा जिंकला नोंदवला. त्यामुळे आता भारताने वर्ल्ड कपवर दावेदारी ठोकल्याचं पहायला मिळतंय. मात्र, भारतासमोर आव्हान आहे ते पाकिस्तानचं.. त्याला कारण ठरतंय. पाकिस्तानची सलामीवीर फलंदाज...मुनीबा अली. मुनीबा अलीने (Muneeba Ali) आयर्लंडविरुद्धच्या T20 विश्वचषक सामन्यात इतिहास रचला आहे.
पाकिस्तानी क्रिकेट टीम (Pakistan Womens Cricket Team) आपल्या खराब फिल्डींगसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, सध्या पाकिस्तान महिला क्रिकेट संघाची सलामीवीर मुनीबा अलीने (Muneeba Ali) चर्चेत आली आहे. आयर्लंडविरुद्धच्या T20 विश्वचषक सामन्यात (pak w vs ire w) शानदार कामगिरी केलीये. 15 फेब्रुवारी रोजी केपटाऊनमध्ये झालेल्या सामन्यात आयर्लंडविरुद्ध फलंदाजी करताना शानदार शतक झळकावलं.
मुनीबा अलीने 68 चेंडूत 102 धावांची वादळी खेळी (Muneeba Ali Century) केली. मुनिबाने आपल्या शतकी खेळीत 14 फोर मारले. तिच्या या फलंदाजीच्या पराक्रमामुळे पाकिस्तानने 165 धावांची आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. तिच्या या आक्रमक खेळीमुळे पाकिस्तानच्या संघाने 70 धावांचा मोठा विजय मिळवला आहे. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये शतक ठोकणारी ती पहिली पाकिस्तानी बॅटर ठरली आहे.
मुनिबाचे पूर्ण नाव मुनिबा अली सिद्दीकी (Muniba Ali Siddiqui) आहे. तिचा जन्म 8 ऑगस्ट 1997 रोजी कराची (Karachi) येथे झाला. 2011-12 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी त्याने बलुचिस्तानकडून देशांतर्गत क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. ती पाकिस्तान ए महिला संघाचाही एक भाग देखील होती. 2016 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ती पाकिस्तान महिला संघाची नियमित प्लेअर आहे.
आणखी वाचा - T20 World Cup : टी-20 वर्ल्डकपमध्ये भारतीय महिलांचा दुसरा विजय; वेस्ट इंडिजचा केला पराभव
दरम्यान, पाकिस्तानकडून खेळताना मुनीबा अलीने (Muneeba Ali Profile) आत्तापर्यंत 30 सामने खेळल आहेत. त्यामध्ये तिने 730 धावा केल्यात. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिच्या नावावर एक शतक तर दोन अर्धशतक आहेत. याशिवाय त्याने पाकिस्तानसाठी आतापर्यंत 45 टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने क्रिकेटच्या टी-ट्वेंटी फॉरमॅटमध्ये 655 धावा केल्या आहेत. मुनीबा अलीचे आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी मध्ये शतक आहे.