शारजाह : महिला टी-20 चॅलेंज विजेतेपदाची प्रबळ दावेदार सुपरनोवाजचा सामना फायनलमध्ये ट्रेलब्लेजर्स विरुद्ध होणार आहे. शनिवारी झालेल्या अंतिम साखळी सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात सुपरनोवाज संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. स्मृती मंधानाच्या नेतृत्वातील संघ ट्रेलब्लेजर्सचा शनिवारी 2 धावांनी पराभव केला होता.
2018 आणि 2019 ची चॅम्पियन सुपरनोवाजने अंतिम ओव्हरमध्ये ट्रेलब्लेजर्सचा दोन धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. सध्याच्या चॅम्पियन्स संघासाठी सलामीवीर चामरी अटापट्टू (111 धावा) ने शानदार कामगिरी केली. श्रीलंकेच्या या अनुभवी खेळाडूने या मोसमात आतापर्यंत सुपरनोवाजसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत.
ट्रेलब्लाझरविरुद्धच्या साखळी सामन्यात तिने 48 बॉलमध्ये 67 धावा करून स्पर्धेत पहिले अर्धशतक झळकावले. कर्णधार हरमनप्रीतने दोन्ही सामन्यांमध्ये 31 धावा केल्या. भारतीय टी-20 संघाची कर्णधार फायनल सामन्यात कशी कामगिरी करते याकडे सर्वांचं लक्ष आहे.
दुसरीकडे ट्रेलब्लेजर्सने स्पर्धेला चांगली सुरुवात केली. इंग्लंडच्या सोफी ऐकलस्टोन आणि अनुभवी झुलन गोस्वामी यांच्या नेतृत्वात, गोलंदाजांनी अवघ्या 47 धावांवर आऊट करत सहज विजय मिळवला. कर्णधार स्मृती दोन सामन्यांत 39 धावा करू शकली आहे. अंतिम सामन्यात संघाला तिच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
सलामीवीर डायंद्र डॉटिन फॉर्ममध्ये आहे. परंतु तिने मोठा डाव खेळलेला नाही. दीप्ती शर्मा (नाबाद) 43) आणि हर्लीन देओल (27) यांनी ट्रेलब्लेजर्सला सुपरनोवाजविरुद्धच्या सामन्यात विजयाच्या उंबरठ्यावर आणले.
शेवटच्या सामन्यात फिरकीपटूंनी महत्त्वाची भूमिका निभावणे अपेक्षित असून दोन्ही संघात चांगले फिरकीपटू आहेत. ट्रेलब्लेजरकडे टी-20 मधील डावखुरी फिरकीपटू एकलेस्टोन आणि राजेश्वरी गायकवाड आहे, तर सुपरनोवाजच्या संघात भारताची स्टार लेगस्पिनर पूनम यादव आणि राधा यादव यांचा समावेश आहे. ट्रेलब्लेजरकडे अनुभवी वेगवान गोलंदाज झूलन आहे तर दक्षिण आफ्रिकेच्या अयाबोंगा खाका आणि वेस्ट इंडिजची शकीरा सेलमन यांनी सुपरनोव्हाससाठी चांगली कामगिरी केली आहे.