World Cup 2019 : इमरान ताहिरचा विक्रम, वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दक्षिण आफ्रिकन

दक्षिण आफ्रिकेचा लेग स्पिनर इमरान ताहिर याने वर्ल्ड कपमध्ये विक्रमाला गवसणी घातली आहे.

Updated: Jun 23, 2019, 10:28 PM IST
World Cup 2019 : इमरान ताहिरचा विक्रम, वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दक्षिण आफ्रिकन title=

लंडन : दक्षिण आफ्रिकेचा लेग स्पिनर इमरान ताहिर याने वर्ल्ड कपमध्ये विक्रमाला गवसणी घातली आहे. इमरान ताहिर हा वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर ठरला आहे. ४० वर्षांच्या इमरान ताहिर याने पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये ही कामगिरी केली आहे. 

या मॅचमध्ये ताहिरला हा विक्रम करण्यासाठी दोन विकेटची गरज होती. इमरान ताहिरने पहिले पाकिस्तानचा ओपनर फकर जमानला आणि मग इमाम उल हकला माघारी पाठवत हा विक्रम केला. २० वर्ल्ड कप मॅचमध्ये ताहिरच्या नावावर ३९ विकेट आहेत. 

ताहिरच्या आधी हे रेकॉर्ड एलन डोनाल्डच्या नावावर होतं. डोनाल्डने २५ मॅचमध्ये ३८ विकेट घेतल्या होत्या. या वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या ५ मॅचमध्ये ताहिरने १० विकेट घेतल्या आहेत.