World Cup 2019 : न्यूझीलंडच्या पराभवानंतर भारत-पाकिस्तान फॅन्सचा भांगडा

क्रिकेट म्हटलं की प्रत्येक क्रिकेट चाहता हा आपल्या टीमचे समर्थन करतो.

Updated: Jun 27, 2019, 06:29 PM IST
World Cup 2019 : न्यूझीलंडच्या पराभवानंतर भारत-पाकिस्तान फॅन्सचा भांगडा title=

ऐजबॅस्टन : क्रिकेट म्हटलं की प्रत्येक क्रिकेट चाहता हा आपल्या टीमचे समर्थन करतो. त्यात इंडिया-पाकिस्तान म्हटंल की, क्रिकेट चाहते एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न करतात. पण काल न्यूझीलंड-पाकिस्तान यांच्यातील मॅच संपल्यानंतर एक सकारात्मक चित्र पाहायला मिळालं.

पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करत किवींची विजयी घौडदौड थांबवली. पाकिस्तानने किवींचा ६ विकेटने पराभव केला. पाकिस्तानच्या विजयानंतर पाकिस्तानी आणि इंडिया टीमच्या दोन समर्थकांनी एकत्र भांगडा करत विजय साजरा केला. हा भांगडा स्टेडियम परिसरात करण्यात आला. सध्या या भांगड्याचा व्हिडियो व्हायरल होत आहे.

अशा प्रकारे पाकिस्तान आणि इंडियाच्या चाहत्यांनी एकत्रित जल्लोष करण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी याच वर्ल्ड कपमध्ये २३ जूनला लॉर्ड्सवर पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना खेळण्यात आला होता. या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा ४९ रनने पराभव केला होता. 

या मॅच दरम्यान एक टीम इंडियाची जर्सी घातलेला समर्थक पाकिस्तान टीमला सपोर्ट करत होता. 'नेबर्स सपोर्ट, कम ऑन पाकिस्तान' असा मेसेज देणारा फलक त्या चाहत्याच्या हातात दिसत आहे.

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आयसीसीने हा फोटो आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन शेअर केला होता. 'स्पीरीट ऑफ क्रिकेट' अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली होती.

दरम्यान पाकिस्तानने वर्ल्ड कपमध्ये केलेल्या सुमार कामगिरीमुळे जगभरातून पाकिस्तान टीमला ट्रोल केले जात होते. त्यातच टीम इंडिया विरुद्ध झालेल्या पराभवामुळे पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर टीका सहन करावी लागली. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिका आणि किवींचा सलग पराभव केला आहे. त्यामुळे पाकिस्तान सेमी फायनलसाठीच्या शर्यतीत कायम आहे.

पाकिस्तानने वर्ल्ड कपच्या यंदाच्या पर्वात एकूण ७ मॅच खेळल्या आहेत. यापैकी ३ मॅचमध्ये विजय आणि ३ मॅचमध्ये पराभव झाला आहे. तर एक मॅच रद्द करावी लागली. पाकिस्तान ७ पॉइंट्ससह पॉइंट्सटेबलमध्ये ६ व्या क्रमांकावर आहे.