ICC World Test Championship : ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज (Australia vs West Indies) यांच्यात खेळला गेलेला कसोटी मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या घातक गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजचे फलंदाज निष्प्रभ ठरले. जोश हेजलवूडच्या भेदक गोलंदाजीनंतर हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला केवळ 26 धावांचं आव्हान मिळालं होतं. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने आरामात पूर्ण केलं असून कांगारूंनी हा सामना एकतर्फी जिंकला. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या विजयाने रोहित शर्माचं (Rohit Sharma) टेन्शन आता वाढलंय. तर टीम इंडियाला (Team India) मोठा सेटबॅक बसला आहे. ऑस्ट्रेलियाच्या विजयाने असं काय झालं?
WTC Points Table मध्ये बदल
विंडिजविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर होता. तर टीम इंडिया दुसऱ्या स्थानावर होती. मात्र, आता या विजयानंतर ऑस्ट्रेलिया आणखी मजबूत झाल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे आता कॅप्टन रोहित शर्माचं टेन्शन वाढलंय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पाईंट्स टेबलमध्ये (WTC Points Table 2023-25) पुन्हा अव्वलस्थानी यायचं असेल तर टीम इंडियाला आगामी इंग्लंडविरुद्ध मोठ्या तयारीने उतरावं लागणार आहे. 9 सामन्यांत 6 विजय मिळवून कांगारूंच्या विजयाची टक्केवारी आता 61.11 वर पोहोचली आहे. भारतीय संघ 4 सामन्यांत 2 विजय मिळवून 54.16 विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे.
सध्या साऊथ अफ्रिकेचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंज संघाची विजयाची टक्केवारी 50 असून हा संघ चौथ्या स्थानावर आहे, तर श्रीलंकेचा संघ पाचव्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा संघ 36.66 टक्केवारीसह सहाव्या स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या लाजीरवाण्या पराभवामुळे आता वेस्ट इंडिजचा संघ थेट आठव्या स्थानी पोहोचला आहे. तर सातव्या स्थानावर पाकिस्तानचा संघ चाचपडतोय.
भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघ –
बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स (यष्टीरक्षक) ), टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.
पहिल्या 2 सामन्यासाठी टीम इंडिया -
रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.
भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेचे पूर्ण वेळापत्रक…
पहिली कसोटी : 25-29 जानेवारी, हैदराबाद (राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम)
दुसरी कसोटी : 2-6 फेब्रुवारी, विशाखापट्टणम (डॉ. वायएस राजशेखर क्रिकेट स्टेडियम)
तिसरी कसोटी : 15-19 फेब्रुवारी, राजकोट (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)
चौथी कसोटी : 23-27 फेब्रुवारी, रांची ( जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम)
पाचवी कसोटी : 7-11 मार्च, धर्मशाला (हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)